Badlapur News: बदलापूर हादरले! त्या दिवशी स्कूल व्हॅनमध्ये नक्की काय घडले? RTO कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित

Badlapur Minor Girl Assault Case Update :  बदलापूरमधील चिमुकलीवर झालेल्या अतिप्रसंग प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Badlapur Minor Girl : बदलापूरमधील अल्पवयीन मुलीबाबत भयंकर प्रकार घडला आहे. (प्रतिकात्मक फोटो )
बदलापूर:


Badlapur Minor Girl Assault Case Update :  बदलापूरमधील चिमुकलीवर झालेल्या अतिप्रसंग प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी चालवत असलेल्या स्कूल व्हॅनला आरटीओचा अधिकृत परवानाच नसल्याचे उघड झाले आहे. आरोपी इमरान पटेल हा कोणत्याही वैध परवान्याशिवाय ही स्कूल व्हॅन चालवत होता. या गंभीर बाबीची दखल घेत आरटीओ प्रशासनाने ती व्हॅन जप्त केली असून त्याला 24000 रुपये दंड देखील ठोठावला आहे. स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेचा आणि परवान्याचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय आहे अपडेट?

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. बदलापूर पोलिसांनी आरोपी इमरान पटेल याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी बंद दारात या प्रकरणाची सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचा प्राथमिक युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

( नक्की वाचा : Nashik News: सून किंचाळत होती अन् सासरा काठीने मारत होता; पोटच्या मुलाने शूट केला सर्व प्रकार, पाहा VIDEO )


ही घटना बदलापूर पश्चिमेतील एका नामांकित शाळेत घडली आहे. तिथे शिकणारी 4 वर्षाची चिमुकली शाळा सुटल्यानंतर जेव्हा घरी परतली, तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती. सुरुवातीला तिने काहीच सांगितले नाही, मात्र तिच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. शाळेच्या व्हॅन चालकानेच चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर शहरात संतापाचे वातावरण असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची बाल हक्क आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. आयोगाकडून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे स्कूल व्हॅन चालवून चिमुकल्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या अशा चालकांवर आणि शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
 

Advertisement