जाहिरात

Nashik News: सून किंचाळत होती अन् सासरा काठीने मारत होता; पोटच्या मुलाने शूट केला सर्व प्रकार, पाहा VIDEO

Nashik Crime News: या निर्दयी मारहाणीमुळे मनिषा यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून त्या वेदनेने अक्षरश: किंचाळत सैरावैरा पळत होत्या.

Nashik News: सून  किंचाळत होती अन् सासरा काठीने मारत होता; पोटच्या मुलाने शूट केला सर्व प्रकार, पाहा VIDEO
Nashik News: अंगावर शहारे आणणाऱ्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
येवला, नाशिक:

Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर गावातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील विद्युत पंप सुरू करण्याच्या एका किरकोळ कारणावरून सासऱ्याने आपल्या सून मनिषा गुडघे यांना काठीने बेदम मारहाण केली. या अंगावर शहारे आणणाऱ्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून संपूर्ण परिसरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

ममदापूर येथील मनिषा गुडघे या शेतात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे सासू, सासरे आणि दीर यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि सासरे बबन गुडघे यांनी रागाच्या भरात मनिषा यांना काठीने बदडून काढले. 

या निर्दयी मारहाणीमुळे मनिषा यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून त्या वेदनेने अक्षरश: किंचाळत सैरावैरा पळत होत्या. विशेष म्हणजे ही सर्व घटना मनिषा यांच्या मुलाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली, ज्यामुळे हा संतापजनक प्रकार सर्वांच्या समोर आला. आपली आपबिती सांगताना पीडित महिलेचा आजही थरकाप उडत आहे.

( नक्की वाचा : Nashik News: आई-बाबा मला माफ करा! हातावर शेवटचा संदेश लिहून नाशिकमध्ये 21 वर्षांच्या तरुणीनं संपवलं आयुष्य )

या गंभीर मारहाणीनंतर जखमी मनिषा गुडघे यांना उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनिषा यांनी दिलेल्या तक्रारीवरून येवला तालुका पोलिसांनी सासरे बबन गुडघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली आहे.

(नक्की वाचा : BJP MLA : 19 वर्षांची लेक आजारी आणि भाजपा आमदाराने केलं दुसरं लग्न ! पहिल्या पत्नीच्या गंभीर आरोपामुळे खळबळ )

घरगुती वादातून सुनेला अशा प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका किरकोळ कारणावरून सासऱ्याची मजल मारहाणीपर्यंत गेल्याने समाजातून तीव्र पडसाद उमटत आहेत. मनिषा यांचे पती दत्तू गुडघे यांनीही या घटनेचा निषेध केला असून, अशा निर्दयीपणे मारहाण करणाऱ्या सासऱ्याला पोलिसांनी कठोर शासन करून धडा शिकवावा अशी मागणी आता सर्व स्तरांतून केली जात आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com