क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल कामठीपुरा येथून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एक 23 वर्षीय खातुन हिला गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळाले होते.
शिंदे सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. यात नियम अटी असताना अनेक महिला याचा फायदा घेत आहे. यात एका अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेने मुंबईत लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल कामठीपुरा येथून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
एक भारतीय, महादेव यादव, वय 34, यालाही आश्रय आणि रसद पुरवून बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एक, उर्मिला 23 वर्षीय खातुन हिला गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीन योजनेचे दोन हप्ते मिळाले होते. पोलिसांनी तिचे आधार कार्ड बनावट असल्याचे म्हटले असले तरी, तिचे वकील सुनील पांडे म्हणाले की, तिला लाडकीचे फायदे मिळाले यावरून ती भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध होते.
नक्की वाचा - Bangladesh Illegal migration : बांगलादेशींनी राज्यभर हात-पाय पसरले, कोकणातून धक्कादायक प्रकार उघड
अटक करण्यात आलेला आणखी एक बांगलादेशी नागरिक, मोहम्मद ओसिकुर रहमान उर्फ झियादली शद्दर याला भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल अटक करण्यात आल्याचा रेकॉर्ड आहे. कायदेशीर कारवाईनंतर त्याला बांगलादेशात पाठवण्यात आलं, परंतु 2014 मध्ये तो पुन्हा भारतात आला. अटक करण्यात आलेल्या इतर बांगलादेशी नागरिकांची ओळख जलाल शेख (28), अलीम रसूल अली (23) आणि मोहम्मद ओसिकुर रहमान अशी आहे. पोलिसांनी सांगितलं की, रहमानने बांगलादेशातून मुंबईत तरुणी आणि महिलांची तस्करी केली.
पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा केला दाखल
भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता 2023, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, 1950, परदेशी कायदा, 1946 आणि परदेशी आदेश, 1948.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने खेतवाडी येथून आणखी चार बांगलादेशी नागरिक आणि एका साथीदाराला अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर जोगेश्वरी, कांदिवली आणि नवी मुंबई येथे शोधमोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये चार बांगलादेशी नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेण्यात आले.