Baramati News: बारामतीत NCP अजित पवार गटाच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

बारामती नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विद्यमान नगरसेवकाच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.किशोर आप्पासाहेब मासाळ असं गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Baramati NCP Cr

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Baramati Crime News Today :  बारामती नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विद्यमान नगरसेवकाच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. किशोर आप्पासाहेब मासाळ असं गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग करणे,मारहाण करणे,तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे, याशिवाय संबंधित महिलेला उद्योजकांकडून खंडणी वसूल करायला लावण्यासाठी तिच्यावर दबाव टाकणे, असे विविध आरोप किशोर मासाळ यांच्यावरती करण्यात आले आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्यात संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून किशोर मासाळ याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी फेब्रुवारी 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. संबंधित पीडित महिलेचे पती यांचे निधन झाले आहे.ती असाह्य आणि विधवा असल्याचा किशोर मासाळ यांनी फायदा घेतला.ओळख असल्याचा गैरफायदा घेत संबंधित पीडित महिलेच्या घरात अनाधिकृतपणे घुसून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा >>Palghar News: वसईच्या 'या' गावात हळहळ! 13 महिन्यांचा चिमुकला स्विमिंगपूलमध्ये बुडाला, रिसॉर्टमध्ये काय घडलं?

महिलेचा पाठलाग केला आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली

या संपूर्ण प्रकाराला पीडित महिलेने विरोध केला असता "आपण पुढारी आहोत तुम्हाला जगू देणार नाही, माझ्या खूप ओळखी आहेत तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवेन" अशी धमकी मासाळ याने पीडितेला दिली.तुझे काही फोटो माझ्याकडे मोबाईलमध्ये आहेत. मी सांगेल तसंच तुला करावं लागेल, असं सांगत आरोपीने वारंवार महिलेचा पाठलाग केला आणि तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील केल्याचा आरोप आहे.

नक्की वाचा >> Big News: "कांद्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मकोका लागणार, इन कॅमेरा..", भाजपा मंत्र्याचा मोठा इशारा

एवढेच नव्हे तर किशोर मासाळ याने संबंधित पीडितेवर उद्योजकांकडे खंडणी मागण्यासाठी दबाव देखील टाकल्याचा आरोप आहे.तू बारामती मधील उद्योजकांना ब्लॅकमेल करून मला पैसे मिळवून दे,नाहीतर तुझे फोटो सोशल माध्यमातून तुझी बदनामी करेल अशी धमकी देखील किशोर मासाळ याने दिली असल्याचं तक्रारीत संबंधित पिढीतेने म्हटलं आहे. या पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 253/2026 बी एन एस कलम 332 (c),74,75,78, 115(2),352,351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बारामती तालुका पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.