सायको किलर! महिलांना शरीर संबध ठेवण्यास सांगायचा, नकार देताचं भयंकर करायचा 

14 महिन्यात 9 खून, ते ही एकाच प्रकारे. यामुळे पोलिसही हादरून गेले होते. या सायको किलरची दहशतही निर्माण झाली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
बरेली:

तो महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्यांच्यावर शरीर संबधांसाठी दबाव टाकायचा. जी महिला ऐकणार नाही तिला थेट तिच्याच साडीने गळा आवळून यमसदनी धाडायचा. अशा एकना अनेक महिलांना त्याने यमसदनी धाडलं. त्यांच्या या विकृतीचा जवळपास 9 महिला शिकार झाल्या आहेत. 14 महिन्यात 9 खून, ते ही एकाच प्रकारे. यामुळे पोलिसही हादरून गेले होते. या सायको किलरची दहशतही निर्माण झाली होती. महिला घरातून बाहेर पडायला घाबरत होत्या. शेवटी पोलिसांनी त्या विकृत सायको किलरला गडाआड केला. त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने पुर्ण पोलिस दल हादरून गेले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये. इथूनच या सायको किलरला पोलिसांनी अटक केली आहे. कुलदीप असे त्याचे नाव असून तो 40 वर्षाचा आहे. बरेलीचे पोलिस अधिक्षक अनुराग आर्य यांनी या संपुर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. आरोपी कुलदीपला महिलां बाबत राग होता. तो महिलांना आपल्या जाळ्यात फसवत असे. त्यानंतर त्या महिलांना आपल्या बरोबर शरीर संबध ठेवण्यास सांगत असे. पण ज्या महिला त्यासाठी तयार होत नसत त्यांना तो त्यांच्याच साडीने गळा आवळून ठार करत  असे. हत्या करण्यासाठी तो एकाच प्रकराचा वापर करत होता. तो महिलांचा गळा त्यांच्या साडीनेच एका विशिष्ठ प्रकारे आवळत होता. त्यामुळे खून करणारा एकच आहे हे पोलिसांनाही समजले होते. अटक केल्यानंतर त्याने आता पर्यंत 6 हत्या केल्याची कबूली दिली आहे. गेल्या 14 महिन्यात याच भागात एकूण 9 महिलांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलिस त्याची आणखी चौकशी करत आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - धक्कादायक! एकाच पद्धतीनं झाल्या 9 महिलांच्या हत्या, मारेकरी मोकाट! सीरिअल किलरची सर्वत्र दहशत

बरेली जिल्ह्यातील शाही आणि शिशगड भागात गेल्या 14 महिन्यात 9 महिलांच्या हत्या झाल्या आहेत. हत्या करण्याची पद्धत समान होती. सर्व महिलांची हत्या ही साडीने गळा दाबून केली गेली होती. हत्येनंतर त्यांचा मृतदेह झाडी किंवा शेतात फेकून दिले जात होते. हत्या केलेल्या सर्व महिलांचे वय हे सरासरी 45 ते 55 वर्ष होते. या हत्या बरेलीच्या विशिष्ठ भागातच होत होत्या. त्यामुळे पोलिसांना सिरिअल किलर असल्याचा संशय आला. त्यानुसार पोलिसांनी आपली सुत्र हलवली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला

या लागोपाठ होत असलेल्या हत्यांमुळे पोलिस दल दबावात होते. कोणत्याही स्थिती आरोपीला पकडण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. त्यानुसार एक वॉर रूम तयार केला गेला. त्यात वेगवेगळ्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. या ऑपरेशनला  'ऑपरेशन तलाश' असे नाव देण्यात आले. त्यासाठी 22 टिम तयार करण्यात आल्या. 22 किलोमिटरपर्यंतचे  1500 CCTV चे फुटेज तपासले गेले. 600 नवे सीसीटीव्ही लावले गेले. महाराष्ट्रातल्या एका सिरिअल किलर केसची स्टडी केली गेली.  दिड लाख मोबाईल क्रमांकांचा डेटा तपासला गेला. यासह पोलिसही अनेक ठिकाणी तैनात केले गेले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली, जयंत पाटील, कोल्हे थोडक्यात बचावले; Video मध्ये पाहा नेमकं काय घडलं

पोलिसांनी या प्रकरणी तीन दिवसां पूर्वी संशयीत आरोपीचे 3 स्केच प्रकाशित केले होते. त्यातील एक स्केच हे कुलदीप बरोबर मिळते जुलते होते. या प्रकरणी साइकोलॉजी तज्ज्ञां बरोबरही चर्चा केली गेली. त्यांचाही सल्ला घेतला गेला. त्यानंतर पोलिसांना समजले की हा सायको किलर शाही पोलिस स्टेशनच्या हद्दील फिरत असतो. तेच त्याचे मुख्य केंद्र होते. त्यानंतर खबऱ्यांना अलर्टवर ठेवण्यात आले. त्यातूनच एकाने सायको किलरची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. 

ट्रेंडिंग बातमी -   दोन दिवसांनी तलावात सापडला तरुणाचा मृतदेह, प्रेयसीच्या हत्येमागचे वाढले गूढ

अटक केल्यानंतर आरोपी कुलदीपबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कुलदीप गंगवार हा नवाबगंज जवळील बाकरगंज या गावात राहाणारा आहे. त्याची वय हे जवळपास 40 वर्ष आहे. पोलिस चौकशी दरम्यान एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे त्याच्या वर्तनामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याला महिलां बाबत मनात द्वेश आणि राग निर्माण झाला. त्यानंतर तो अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत होता. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करत होता. त्या गोष्टीसाठी महिलने नकार दिल्यास तिथेच तो त्याना मारून टाकत होता.