शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान (Shivswarajya Yatra) एका अपघातात जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. क्रेन खाली कोसळली असती तर मोठा अपघात झाला असता. सुदैवाने ते यातून बचावले आहेत.
शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघात झाल्याने जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, महबुब शेख थोडक्यात बचावलेत. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून सर्वजणं थोडक्यात बचावलेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा (Shivswaraj Yatra) काढण्यात येत आहे. आजपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान रोहित पवार, रोहीत पाटील या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित नसल्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अजित दादांच्या यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही यात्रेची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या यात्रेचे नाव शिवस्वराज्य असे आहे. हा यात्रेचा दुसरा टप्पा असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलयं. आजपासून यात्रेला शिवनेरी किल्ल्यावरुन सुरुवात होत आहे. यात्रेच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे जनतेसमोर आणणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 2019 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रा काढली होती. तेव्हा राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रयतेच्या हाताला काहीच लागलेले नाही. वीजदरवाढ, टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणाच राहिल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण हे यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world