Beed Crime : बीडची सोनम! विवाहित महिलेच्या माहेरच्यांनी नवऱ्यावर केला हल्ला, हात-पाय मोडले!

Beed Crime News : बीडमधील एक विवाहितेने माहेरच्यांच्या मदतीने पतीवर अक्षरशः हल्लाच केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed Crime News : रामहरी मोरे असे मारहाण झालेल्या पतीचे नाव आहे..त्याचे लग्न गेल्यावर्षी मे महिन्यात झाले होते.
बीड:

आकाश सावंत, प्रतिनिधी 

इंदूरचा व्यापारी राजा रघुवंशी हत्या प्रकरणानं (Raja Raghuvanshi Murder Case) सध्या देशभर खळबळ उडाली आहे. राजाची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशीनं (Sonam Raghuvanshi) मारेकऱ्यांना सुपारी देऊन केली होती. हे प्रकरण सध्या चर्चेत असताना मराठवाड्यातील बीडमध्येही एक धक्कादाययक प्रकरण उघड झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण?
 

बीडमधील एक विवाहितेने माहेरच्यांच्या मदतीने पतीवर अक्षरशः हल्लाच केला आहे. दहा महिन्यांच्या संसारानंतर सततच्या वादाला कंटाळून वेगळं राहण्याचा निर्णय पतीने घेतला. पण हा निर्णय पत्नीला खटकल्याने तिने थेट आपल्या भावाकडे तक्रार केली. 

त्यानंतर मेहुणा, सासू, पत्नी आणि मेहुणीने मिळून पतीचा पाठलाग करत त्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांसह दगडांनी हल्ला करत त्याचा डावा पाय दोन ठिकाणी फोडला.

( नक्की वाचा : Beed News : लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, बीडमधील धक्कादायक प्रकरण )

रामहरी मोरे असे मारहाण झालेल्या पतीचे नाव आहे..त्याचे लग्न गेल्यावर्षी मे महिन्यात झाले होते. पत्नीसह तो बीडमध्ये किरायाने राहत असताना वारंवार वाद होऊ लागल्याने त्याने बीडमध्येच दुसऱ्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला.. परंतु ही बाब खटकल्याने रामहरीच्या पत्नीने त्याच्या मेव्हण्याकडे तक्रार केली.

Advertisement

त्यानंतर मेव्हण्याने चार चाकी गाडीतून रामहरी याचा पाठलाग करत त्याला रस्त्यात गाठले व त्या ठिकाणी तिघांनी मिळून दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.. यात रामहरीचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला त्याच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून आता या प्रकरणात मेहुना, पत्नी व सासू तसेच मेहुणीच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Topics mentioned in this article