- बीडमध्ये व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची थेट धमकी दिली गेली आहे
- धमकी देणाऱ्या व्यक्तीने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे नाव ही घेतले आहे
- ऑडिओ क्लिपमध्ये धमकी देणारा वाल्मिक कराडचा माणूस असल्याचा दावा होत आहे
आकाश सावंत
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारण ही तसेच आहे. बीडमधून एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यांना गोळ्याच घालतो. पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे नाव घ्यायचे नाही असं ही तो सांगत आहे. शिवाय शिवीगाळ करताना ही तो दिसत आहे. या ऑडीओ क्लिपची NDTV मराठी मात्र पुष्टी करत नाही.
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.या क्लिपमध्ये धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे नाव घेण्यात आले आहे. सध्याला ही कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियवार प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मी थेट मनोज जरांगे यांना गोळ्या घालून जिवे मारणार आहे असं सांगत आहे.
त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घ्यायचे नाही. नाही तर तुलाही जीवे मारतो अशी जरांगे समर्थकालाही जीवे मारण्याची धमकी यात देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती हा वाल्मिक कराडचा माणूस असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला जरांगे समर्थक विचारतो तू काय करणार आहे पाटलाला. त्यावर समोर व्यक्ती सांगतो की मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या, मी स्वतः गोळ्या घालतो असं सांगतो. त्यावर जरांगे समर्थक विचारतो तू गोळ्या घालणार आहेस का त्यावर मी स्वतः घालतो गोळ्या असं तो सांगतो.
बीडमध्ये व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लीपमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. दोन मद्यपी मधला हा ऑडिओ कॉल आहे. याच दरम्यान एका मद्यपीकडून थेट मनोज जरांगे पाटील यांनाच गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. सध्या हा ऑडिओ व्हायरल होतोय त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. ऑडिओ मधील दोन्ही व्यक्ती हे कोण आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. याप्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार प्राप्त नाही. ऑडिओ हा बीडचा आहे की आणखीन कुठल्या जिल्ह्यातला आहे हेही स्पष्ट होत नाही. दरम्यान या ऑडिओची पुष्टी NDTV मराठी करत नाही.