जाहिरात

Shocking news: विद्यार्थ्यांनीच प्राध्यापकाला धु-धू धुतलं!,Video होतोय तुफान Viral, कारण ऐकून हादरून जाल

दरम्यान या मारहाणीचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Shocking news: विद्यार्थ्यांनीच प्राध्यापकाला धु-धू धुतलं!,Video होतोय तुफान Viral, कारण ऐकून हादरून जाल
  • यवतमाळमधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकावर विद्यार्थिनीला चुकीचा स्पर्श केल्याचा गंभीर आरोप
  • प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी व्हॉट्सॲपवर अश्लील संभाषण केल्याचा देखील विद्यार्थिनीने आरोप केला आहे
  • विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला स्टाफ रूममध्ये मारहाण केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
यवतमाळ:

प्रतिक राठोड 

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातं हे गुरू शिष्याचं पवित्र नातं समजलं जातं. गुरू आपल्या शिष्याला घडवत असतात. मोठं करत असतात. पण याच नात्याला धक्का लागेल असा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय या निमित्ताने शाळा महाविद्यालय ही विद्यार्थिनींसाठी सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वांना हादरवणारी ही घटना यवतमाळमध्ये घडली आहे. हा प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजमधील प्राध्यापकावर विद्यार्थिनीला चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप आहे. यावर हा प्राध्यापक थांबला नाही. तर त्याने संबंधीत विद्यार्थीनी सोबत व्हॉट्सॲपवरून अश्लील संभाषण केले आहे. असा त्या विद्यार्थिनीने आरोप केला आहे. ही बाबत तिने आपल्या कॉलेजच्या मित्रांना सांगितली. प्राध्यापक असं करू शकता हे ऐकून ते ही हबकले. सर्व विद्यार्थी त्या प्राध्यापकाला जाब विचारण्यासाठी स्टाफ रूममध्ये गेले. 

नक्की वाचा - Navneet Rana: लग्नाचा वाढदिवस अन् राणा दाम्पत्य पोहोचलं 'या' खास ठिकाणी, Video होतोय Viral, कमेंटचा ही पाऊस

तिथे संबंधीत प्राध्यापक बसला होता. विद्यार्थ्यांनी त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने थांबा थांबा असं सांगितलं. पण विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला होता. ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या पैकी काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाच्या थेट कानशिलात लगावली. ती इतक्या जोरात होती की तो प्राध्यापक शेवट पर्यंत स्वत: ला सावरू शकला नाही. एका मागून एक विद्यार्थ्यांनी त्याच्यावर हात साफ केले. दणा दण फटके पडेले. संपूर्ण स्टाफ रूम हाणामारीचा आखाडा बनला.   

नक्की वाचा - Sunetra Pawar: अर्थ खातं नाही पण 'या' दोन जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांकडे कायम, शासन निर्णय ही निघाला

कॉलेज परिसरात हा प्रकार झाल्याने विद्यार्थ्यां बरोबर इतर प्राध्यापकांची ही धावपळ झाली. काही प्राध्यापक ज्या प्राध्यापकाला मारहाण करत होते त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावले. पण विद्यार्थ्यांचा राग इतका होता की ते ही त्याला वाचवू शकले नाही. कुणी काना खाली तर कुणी लाथा बुक्क्यांनी प्राध्यपकाला हाणत होते. त्याच वेळी ती विद्यार्थिनीही तिथं आलं. तिने ही प्राध्यापकला जाब विचारला. तुझ्या मुलीला ही तु असचं करशील का अशी विचारणा केली. त्यावेळी मला मारू नका अशी विनवणी याचना तो प्राध्यपक करत होता. पण त्याचं कुणी ऐकत नव्हते. 

नक्की वाचा - Pune News: स्पा, लॉजच्या नावाखाली नको ते धंदे!, पोलीसांची धाड अन् मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, अनेक तरुणींची सुटका

दरम्यान या मारहाणीचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ ही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मारहाण केल्यानंतर आणि आरोप केल्यानंतर ही संबंधीत मुलीने अजूनही त्या प्राध्यापका विरूद्ध कोणतीही पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, घटनेची गंभीर दखल घेत कॉलेज प्रशासनाने संबंधित प्राध्यापकाला तात्काळ बडतर्फ केल्याचं स्पष्ट केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com