Beed News : संतोष देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा होता प्लान? एका महिलेला अटक करणार, कराडचही कनेक्शन

बीडमधील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृणपणे झालेल्या हत्या प्रकरणात नवनवे अपडेट समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बीड:

बीडमधील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृणपणे झालेल्या हत्या प्रकरणात नवनवे अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. वाल्मिक कराड याला अटकेची मागणीही केली जात आहे. मात्र अद्याप तरी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली नाही. तो फरार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या 24 तासात वाल्मिक कराड शरण जाणार असल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान या प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात लवकरच एका महिलेला अटक केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अटक करण्यात येणारी महिला धाराशिव जिल्यातील असून ही महिला वाल्मिक कराडची निकटवर्तीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंधित असलेल्या आणखी एका महिलेला अटक केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा वापर करून संतोष देशमुखांना विनयभंगाच्या प्रकरणात अडकवण्याचा प्लान होता. 

नक्की वाचा - Santosh Deshmukh case : राष्ट्रवादीच्या संध्या सोनावणेंची 7 तास कसून चौकशी, CID ने काय विचारलं?

भाजप आमदार आणि गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे सुरेश धस यांनी या महिलेच्या अटकेची मागणी केली आहे. यापूर्वीही खोट्या विनयभंगाच्या तक्रारीसाठी या महिलेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याची पत्नी आणि अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणात या तिसऱ्या महिलेचा संबंध समोर आला आहे. 

Advertisement