Beed News : घरासमोरच लघुशंका अन् जुगाराला विरोध केल्याचा संताप; महिलेला अमानुषपणे मारहाण

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना समोर आली आहे. गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी निखिल आबुज आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी वाल्मिक कराडचा समर्थक आहे. वाल्मिक कराडसोबतचे फोटो देखील आता समोर आले आहेत. 

महिलेसोबत नेमकं काय घडलं? 

बीडमधील रंजेगाव येथील एका गावात ही घटना घडली. महिलेने केलेल्या आरोपानुसार, काही तरुण व्यक्ती तिच्या घरासमोर जुगार खेळत बसले होते. याला विरोध केल्यामुळे तिला बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय त्या आरोपींनी महिलेच्या घरासमोरच लघुशंका केल्याने ती संतापली होती. गावात सुरू असलेल्या जुगाराच्या डावामुळे लहान शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होतो, असं म्हटल्यानंतर आरोपी तरुणांनी महिलेला मारहाण सुरू केली केली.

Advertisement

नक्की वाचा - 10 महिन्यांपर्यंत शौचालयात बंद, कच्चा भात-कांदा जेवण; नवं विवाहितेवर सासरच्या घरात भयंकर दुष्कृत्य

महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसू नयेत म्हणून तिच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा क्रूर आणि भयाण प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यावेळी महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी उचलून फेकले. सुदैवाने त्यांना किरकोळ इजा झाली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
 

Topics mentioned in this article