Beed News: 'जिल्हाधिकाऱ्यांचा 'पीए' बनवते', सुंदर तरुणीने तरुणावर जाळं टाकलं, तरुण अडकला अन् पुढे जे घडलं ते..

हे आश्वासन देताना तिने आपण महसूल विभागातील अधिकारी असल्याचं ओमकारला सांगितलं होतं.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • एका तरुणीने सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला लुटले
  • ओमकार संतोष शिंदे नावाच्या तरुणाला महसूल विभागातील अधिकारी असल्याचा या तरुणीने बनाव केला
  • काजलने जिल्हाधिकारी कार्यालयातील वैयक्तिक सहायक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बीड:

आकाश सावंत 

सध्या बेरोजगारीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे तरुणी कोणती ही नोकरी करण्यास तयार असतात. शिवाय कोणत्या ही पद्धतीन नोकरी मिळवण्याची त्यांची मानसिकता असते. यातूनच त्यांची फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. असाच एक प्रकार बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईत समोर आला आहे. अंबाजोगाईत सरकारी नोकरीच्या आशेवर पाणी फेरणारी आणि बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांवर डल्ला मारणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहायक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. हे आमिष एका सुंदर तरुणीने एका 24 वर्षीय सुशिक्षित तरुणाला दाखवले. नोकरी मिळणार या आशेने त्याने तिच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर जे काही झालं त्याने तो ही हादरला आणि जिल्हा ही हादरला आहे. 

ओमकार संतोष शिंदे हा तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याला सरकारी नोकरीची संधी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन त्याला काजल देविदास भट्ट या तरुणीने दिलं होतं. हे आश्वासन देताना तिने आपण महसूल विभागातील अधिकारी असल्याचं ओमकारला सांगितलं होतं.  एवढेच नाही तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संपर्क असल्याचा दावा ही तिने त्याच्या समोर केला होता. त्यामुळे ओमकारने ही तिच्यावर विश्वास ठेवला. दोघांमध्ये ही विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात पीए पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे तिने ओमकारला सांगितले. सुरुवातीला त्याच्याकडून मोठी रक्कम मागण्यात आली. नंतर व्यवहार निश्चित करत टप्प्याटप्प्याने लाखो रुपये घेतल्याचा आरोप ओमकारने केला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: पुण्यात रंगली आणखी एक 'रेव्ह पार्टी', 'प्रोजेक्ट एक्स' च्या नावाखाली 70 तरुण-तरुणी झिंगले अन् आता..

नोकरीचे आश्वासन, अधिकाऱ्यांची नावे आणि प्रभावशाली ओळखींचा आधार घेत तरुणाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. असे करत तब्बल 4 लाख रुपये या तरुणाकडून उकळण्यात आले. दरम्यान अपेक्षित नोकरी न मिळाल्याने आणि संशय बळावल्याने संबंधित तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी काजल देविदास भट्ट हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी बळी पडले आहेत का, आरोपीने इतरांकडूनही अशाच प्रकारे पैसे उकळले आहेत का, याचाही तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

नक्की वाचा - Trending News: न्यूजपेपरच्या कागदात आता विकता येणार नाही वडापाव, तसं कराल तर थेट..., FDA चा मोठा निर्णय

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने तिने वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरूपात एकूण 4 लाख रुपये उकळले. 3 जून रोजी तिने व्हॉट्सअॅपवर एक नियुक्ती आदेश पाठवला. त्यावर कोणताही अधिकृत शिक्का किंवा लोगो नव्हता. जॉईनिंगची तारीख रविवारची असल्याने ओमकारला संशय आला. फसवणूक उघड होताच. कुटुंबीयांनी जाब विचारला, तेव्हा तिने घाबरून 1 लाख रुपये ऑनलाइन परत केले. उर्वरित पैशांवरून उद्धट वर्तन करत ती घरातून पळून गेली. अशा घटनांमुळे सरकारी नोकऱ्यांच्या भरतीच्या नावाने मोठ्या प्रमाणात फसवणुकीची प्रकरणे होत आहेत. ही तरुणांसाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल.