Bengaluru Girl Body in Suitcase: बंगळुरच्या बाहेरील बाजूस असलेल्या जुन्या चंदपुरा रेल्वे पुलाजवळ एका सुटकेसमध्ये सुमारे १८ वर्षांच्या अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. होसूर मेन रोडजवळ रेल्वे रुळांच्या बाजूला ही सुटकेस बेवारस अवस्थेत आढळून आली. प्राथमिक माहितीनुसार, तरुणीची हत्या इतरत्र करण्यात आल्याचा अंदाज आहे. या हत्येनंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरला असावा आणि त्यानंतर तो चालत्या रेल्वेतून फेकून दिला असावा, अशी शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सूर्यनगर पोलिसांनी सुरुवातीची चौकशी सुरु केली आहे.रेल्वे पोलिसांनी सुटकेस उघडल्यानंतर आणि तिची तपासणी केल्यानंतर सखोल चौकशी सुरू केली जाईल.
बंगळूरु ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सी.के. बाबा यांनी सांगितलं की, 'आम्ही आमचा तपास सुरू केला आहे. सुटकेस धावत्या रेल्वेमधून फेकण्यात आली असावी असा अंदा अंदाज आहे.सामान्यतः असे गुन्हे रेल्वे पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येतात, परंतु घटनेचा संबंध आमच्या क्षेत्राशी असू शकतो, त्यामुळे आम्ही यात लक्ष घालत आहोत.'
( नक्की वाचा : Yavatmal News: मुख्याध्यापिका आणि शिक्षकाचं लव्ह मॅरेज, वर्षभरातच खेळ संपला! विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याची हत्या )
या सुटकेसमध्ये फक्त तरुणीचा मृतदेह होता. त्यामध्ये कोणतेही ओळखपत्र किंवा वैयक्तिक वस्तू आढळल्या नाहीत. तरुणीचं वय किमान 18 वर्ष आहे, असा अंदाज आहे. पण, तिची ओळख अद्याप पटलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.