जाहिरात

Yavatmal News: मुख्याध्यापिका आणि शिक्षकाचं लव्ह मॅरेज, वर्षभरातच खेळ संपला! विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याची हत्या

Yavatmal Crime News : मुख्याधिपिका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केली आहे.

Yavatmal News: मुख्याध्यापिका आणि शिक्षकाचं लव्ह मॅरेज, वर्षभरातच खेळ संपला! विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याची हत्या
मुंबई:

Yavatmal Crime News  : त्या शाळेच्या मुख्याधिपिका होत्या. तो त्या शाळेत शिक्षक होता. दोघांमध्ये प्रेम जुळलं. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी आंतररजातीय प्रेम विवाह केला. मुख्याधिपिका आणि शिक्षकाती लव्ह स्टोरी फार काळ टिकली नाही. वर्षभरातच त्यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर मुख्याध्यापिकेने विष देऊन नवऱ्याचा जीव घेतला.  त्यानंतर तिने शिकवणीसाठी येणाऱ्या इयत्ता नववीतील तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने जंगलात नेऊन पतीचा मृतदेह पेटवून दिला. यवतमाळमध्ये ही धक्कादाक घटना घडली आहे. 

काय आहे प्रकरण?

यवतमाळच्या दारव्हा रस्त्यावरील सनराईज इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये शंतनू अरविंद देशमुख तात्पुरत्या स्तरावर शिक्षक म्हणून कार्यरत होते. याच शाळेत त्यांची पत्नी निधी ही मुख्याध्यापिका आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. काही दिवस संसार सुखात चालला होताय त्यानंतरशंतनूला दारूचे व्यसन जडले. 

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईल मधील निधीचे अश्लील चित्र  व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. तो निधीला मारहाण देखील करत होता.  या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काटा काढण्याचे ठरविले. 13 मेच्या दुपारी तिने इंटरनेटवर विष तयार करण्याचा व्हिडिओ पाहून त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून खरेदी केले. 

रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य

( नक्की वाचा :  रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य )

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईल मधील निधीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. तो निधीला मारहाण देखील करत होता.  या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काटा काढण्याचे ठरविले. 13 मेच्या दुपारी तिने इंटरनेटवर विष तयार करण्याचा व्हिडिओ पाहून त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून खरेदी केले. 

त्यानंतर रात्री शंतनू मद्यधूंद अवस्थेत घरी परतला. निधीने शेकमध्ये त्याला विष मिसळून दिले. ते पिताच शंतनू हा काही क्षणातच जागीच ठार झाला. त्यानंतर तिने ही माहिती ट शिकवणीला येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सांगितले त्यांना भावनिक करीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सांगितले.

Mumbai Local : लोकलमध्ये दिव्यांग महिलेला मारहाण, Video Viral होताच एका तासामध्ये आरोपीला अटक

( नक्की वाचा :  Mumbai Local : लोकलमध्ये दिव्यांग महिलेला मारहाण, Video Viral होताच एका तासामध्ये आरोपीला अटक )

मृदेहाची ओळख पटून आपली अडचण वाढणार ही भीती वाढताच निधी परत जंगलात गेली. तिने पेट्रोल टाकून पतीचा मृतदेह पेटवला. यानंतर काहीही घडले नसल्याप्रमाणे वावरू लागली. हा जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला.  पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या चौकशीमध्ये शंतनू काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शंतनूच्या मित्रांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविले.

मृतदेह शंतनूचा असल्याचे सांगितले स्पष्ट होताच निधी आणि तिच्या भावाला चौकशीसाठी बोलविले. पोलिसी खाक्या दाखविताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. लोहारा पोलिसांनी मुख्याध्यापिका निधी शंतनू देशमुख  (वय- 23 ) अटक केली आहे. तर तीन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com