जाहिरात

OMG : कारचा आरसा लागल्याने संताप, पती-पत्नीने 2 किलो मीटर पाठलाग करत तरुणाला चिरडले; पाहा धक्कादायक Video

Bengaluru Road Rage Murder:  कर्नाटकमधील बंगळूरु शहरात (Road Rage) एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे.

OMG : कारचा आरसा लागल्याने संताप, पती-पत्नीने 2 किलो मीटर पाठलाग करत तरुणाला चिरडले; पाहा धक्कादायक Video
Bengaluru Road Rage Murder: कारमधील जोडप्याने बाईकस्वारांचा कथितरित्या सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.
मुंबई:

Bengaluru Road Rage Murder:  कर्नाटकमधील बंगळूरु शहरात (Road Rage) एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. कारच्या साइड मिररला बाईकचा स्पर्श झाल्यामुळे झालेल्या किरकोळ वादातून एका संतप्त जोडप्याने बाईकस्वारांचा 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्यांना कारने जाणीवपूर्वक धडक दिली. या भीषण घटनेत दर्शन नावाच्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कार चालक पती-पत्नी मनोज कुमार आणि आरती शर्मा यांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

बंगळूरुच्या पुत्तेनहल्ली परिसरातील श्रीराम लेआउटजवळ 25 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता ही घटना घडली. यावेळी  दर्शन आणि वरुण हे बाईकवरून जात असताना त्यांच्या बाईकचा कारला (ज्याचा साइड मिरर उघडा होता) किरकोळ धक्का लागला. यावरून कार चालक मनोज कुमार आणि आरती शर्मा यांच्यात आणि बाईकस्वारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

वादातून संतप्त झालेल्या कारमधील जोडप्याने बाईकस्वारांचा कथितरित्या सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या बाईकला कारने जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'ती' रात्री एकटीच गेली... महिला डॉक्टराच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, Video )
 

कारच्या धडकेने बाईकस्वार दर्शन आणि वरुण रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. दर्शनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वरुण अजूनही गंभीर जखमी आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यात कार जाणीवपूर्वक बाईकस्वारांना रस्त्याच्या बाजूला जाऊन धडक देऊन पुढे निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

चौकशीत धक्कादायक खुलासा

या प्रकरणात सुरुवातीला जेपी नगर वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात (Accident) म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र, चौकशीत हा रोड रेजमधून झालेला 'खुनाचा' प्रकार असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोडप्याने पहिल्या प्रयत्नात बाईकस्वारांना धडक दिली नाही. त्यांनी यू-टर्न घेऊन पुन्हा त्यांच्याजवळ आले आणि जाणीवपूर्वक त्यांना टक्कर दिली.

टक्कर दिल्यानंतर आरोपी जोडप्याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी तोंडावर मास्क लावून पुन्हा घटनास्थळी येऊन कारचे तुटलेले भाग उचलले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असेही पोलीस तपासात समोर आले आहे.

मृतक दर्शन हा 'गिग वर्कर' (Gig Worker) म्हणून काम करत होता. आरोपी मनोज कुमार हा 'फिजिकल आर्ट्स टीचर' (Physical Arts Teacher) आहे. पुत्तेनहल्ली पोलीस आता या 'रागातून झालेल्या हत्येच्या (Murder due to Road Rage) प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

इथे पाहा Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com