महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे केले, फ्रिजमध्ये ठेवले, पुढे जे झालं ते...

एक 29 वर्षीय विवाहीत तरूणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले.

जाहिरात
Read Time: 3 mins
बंगळुरू:

श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण करून देणारी आणि सर्वांना पुन्हा एकदा हादरवून सोडणारी घटना घडली आहे. ही घटना बंगळूरूमध्ये घडली आहे. इथं एक 29 वर्षीय विवाहीत तरूणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. मृतदेहाचा वास येवू नये म्हणून त्यावर काही केमिकल टाकण्यात आले होते हे ही समोर आले आहे. चार ते पाच दिवसापूर्वी तिची हत्या झाल्याचेही समोर आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या कोणी आणि का केली याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. व्यालीकवळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुनेश्वरनगर इथं ही घटना घडली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे ती विवाहित आहे. मात्र ती पती हुकुमसिंग राणा यांच्या पासून वेगळी राहाते. तिला मुलं असल्याचेही समोर आले आहे. बंगळूरूमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून तिने एक भाड्याचे घर घेतले आहे. त्याच घरात ती रहात होती. पण गेल्या काही दिवसापासून हे घर बंद होतो. याची कल्पना तिच्या घरच्यांना देण्यात आली. त्यानंतर तिच्या घरचे बंगळूरूमध्ये आहे. त्यावेळी तिचा फोनही बंद होता. याबाबत पोलीसांनाही माहिती देण्यात आली.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आधी शरीरसंबंध बनवले, नंतर तिचे तुकडे तुकडे केले, इंजिनिअर तरूणाचे टोकाचे पाऊल का?

तिच्या कुटुंबीयांना घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना घरात वास येत होता. त्याच वेळी महिलेच्या बहिणीने फ्रिज उघडला. त्यावेळी फ्रिजमध्ये शरीराचे 30 तुकडे दिसून आले. हे पाहून घरच्यांच्या पाया खालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने पोलीसांना कळवलं. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जे तुकडे केले होते त्यावर रसायन फवारण्यात आले होते. हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून पळ काढला होता. शिवाय तरूणीचा फोन 2 सप्टेबरपासून बंद होता. त्याच वेळी हा खून झाल्याचा संशय पोलीसांना आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - KDMC News : 11 वर्षाच्या मुलाला भेटायला मैत्रिण घरी आली, आई-वडिलांनी पाहिलं पुढं धक्कादायक घडलं

खून झाला त्या परिसरात राहाणाऱ्या व्यक्तींनीहा काही माहिती दिली आहे. ज्या तरूणीचा खून झाला ती एकटी राहात होती. शिवाय ती रोज सकाळी साडे नऊ वाजता कामाला जात होती. रात्री दहा वाजता ती कामावरून घरी परतत होती. तिचा मोठा भाऊ काही दिवस तिच्या बरोबर राहून गेला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून तिचे घर बंद होते. त्यामुळे स्थानिकांना संशय आला. त्यांनी तिच्या कुटुंबीयांना कळवले. ज्या वेळी घर उघडले त्या वेळी हा सर्व प्रकार समोर आला. घरात तिचे तुकडे तुकडे करण्यात आले होते.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune Crime : मुलींसमोरच वडिलांची निर्घृण हत्या, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला घात

अशीच घटना 2022 मध्ये दिल्लीत झाले होते. वसईच्या श्रद्धा वालकर या तुरूणीची तिचा प्रियकरआफताब पूनावाला याने हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्यातील एक एक तुकडा तो फेकून देत होता. त्याने श्रद्धाच्या शरिराचे जवळपास 17 तुकडे केले होते. ते त्याने तीन आठवडे फ्रिजमध्ये लपवून ठेवले होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तशीच ही घटना आता बंगळूरूमध्ये समोर आली आहे.