जाहिरात
This Article is From Sep 21, 2024

Pune Crime : मुलींसमोरच वडिलांची निर्घृण हत्या, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला घात

Pune Crime News : अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.  राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय 42 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. 

Pune Crime : मुलींसमोरच वडिलांची निर्घृण हत्या, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला घात

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यातील कर्वेनगर उच्चभ्रू श्रीमान सोसायटीमध्ये हत्येची घटना समोर आली आहे. चोरीच्या घटनेतून ही हत्या झाली असावी असं प्राथमिक दृष्ट्या वाटत होतं. मात्र पोलिसांना कसून तपास केला असता अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.  राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय 42 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवल्याने राहुल यांनी दरवाजा उघडला. मात्र आरोपींनी अचानक राहुल यांच्यावर  धारदार शस्त्राने सपासप वार केले. दरम्यान राहुल यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या. मात्र आरोपी तो पर्यत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तूची लूट करुन पसार  झाले होते.

(नक्की वाचा-  प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावून बसला, धुळ्यात नेमकं काय घडलं?)

पोलिसांना आधी हा सगळा प्रकार चोरीचा वाटला. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पूर्वीदेखील त्यांनी हत्येचा प्लान केला होता. मात्र मागच्या वेळी तो प्लान फसला, अशी माहिती पोलिसांना दिली. 

(नक्की वाचा - घड्याळाचे काटे फिरणार? अजित पवारांना नवीन चिन्हावर निवडणूक लढावावी लागण्याची शक्यता)

मुलींच्या समोरच वडिलांची हत्या

राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली आहेत. आरोपींच्या तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपींना पाहूनही ओळखता आले नाही. डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: