
इंजिनिअर असलेल्या एका 23 वर्षीय तरूणाने एक भयंकर कृत्य केले आहे. चेन्नईतल्या थोरईपक्कम इथं ही भयंकर घटना घडली आहे. या तरूणाने घरी कोणी नसताना एका कॉलगर्लला आपल्या घरी बोलावले. तिच्या बरोबर रात्रभर शरीरसंबध प्रस्थापित केले. त्यानंतर त्या महिलेची त्याने हत्या केली. तो त्यावर थांबला नाही. तिचे त्याने तुकडे तुकडे केले. ते सर्व तुकडे त्याने एका बॅगमध्ये भरले. ही बॅक एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या आवारात त्याने टाकले. पण त्याने ही हत्या का केली या मागचे कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही त्याचा धक्का बसेल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एम. मणिकंदन हा इंजिनिअर आहे. तो चेन्नईमध्ये राहातो. त्याने एक घर इथे भाड्याने घेतले होते. घरातली गावी गेले होते. ही संधी साधून त्याने एका 35 वर्षीय कॉलगर्लला घरी बोलावले. एका ओळखीच्या व्यक्ती कडून या कॉलगर्लला त्याने संपर्क केला होता. ती घरी आल्यानंतर या दोघांमध्ये शरीरसंबंध झाले. त्यानंतर संबधित महिलेने एम. मणिकंदन याच्याकडे पैशाची मागणी केली. पैशावरून या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जोरात भांडण सुरू होते. त्यावेळी एम. मणिकंदन याचा रागाचा पारा चढला. त्याने त्याच वेळी तिच्या डोक्यावर हतोड्याने वार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
त्याच वेळी महिला घरी आली नाही, त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. तिच्या भावाने पोलिसात धाव घेतली. तिच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. त्या महिलेचा फोन बंद येत होता. त्यानंतर पोलिसांनी 'फाइंड माई डिवाइस' या फिचरचा वापर केला. त्यानंतर त्या महिलेला ट्रेस करण्यात आलं. ज्या ठिकाणी महिलेचा फोन बंद झाला होता त्या ठिकाणी पोलिस पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांना एक मोठी बॅग मिळाली. ही बॅग उघडल्यानंतर त्यात त्या महिलेचा मृतदेह सापडला. तिच्या भावानेही तिचा मृतदेह ओळखला.
पोलिसांना तिचा मृतदेह मिळाला होता. आता तिला कोणी मारले हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्या व्यक्तीला शोधण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. काही लोकांची ही चौकशी केली. त्यानंतर एम. मणिकंदन पर्यंत पोलिस पोहोचले. एम. मणिकंदनला अटक केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. शिवाय आपण ही हत्या का केली हे ही पोलिसांना सांगितले.
एम. मणिकंदन ने पोलिसांना सांगितले की, त्या कॉलगर्ल बरोबर त्याची पैसे देण्यावरून भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने तिचा खून केला. हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह घरातच ठेवला होता. त्यानंतर तो तिचे तुकडे तुकडे करून तो फेकून देणार होता. मात्र गावी गेलेले त्याचे घरातले लोक एक दिवस आधीच परत येणार होते. अशा वेळी तो घाबरला. त्यानंतर त्याने बाजारातून एक मोठी बॅग खरेदी केली. त्यात तिची बॉडी भरली. सकाळ झाल्यानंतर त्याने ती बॅग एक इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी फेकून दिली अशी कबुली त्याने दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world