अभय भुटे, भंडारा:
Bhandara money laundering Fraud: महाराष्ट्रात सायबर क्राईम, फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हनी ट्रॅप, सायबर अरेस्टची भिती दाखवत लुटल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अशीच घटना भंडाऱ्यामधून समोर आली आहे. भंडाऱ्याच्या तुमसर येथे व्हिडिओ कॉल वरून मनी लाँड्रिंगची धमकी देत २० लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप करून एका अज्ञात व्यक्तीने ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉलद्वारे गंभीर धमकी दिली. त्यानंतर दोन वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये त्याच्याकडून २० लाख ६१ हजार ३२० रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी हरिशंकर चौबे यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिराज शुक्ला नावाच्या व्यक्तीने तुमसर येथील शिवाजीनगर येथील रहिवासी हरिशंकर चौबे (वय ७४) यांना व्हिडीओ कॉल केला. आपण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणमध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली. नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचा सहभाग आहे.
दोघांविरोधात गुन्हा
त्यामुळे आपल्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जात असल्याची धमकी दिली. एवढेच नाही तर, त्यांच्या नावाने असलेल्या सीम कार्ड नंबरवरून अश्लील फोटो तयार केले जात आहेत. या प्रकरणातदेखील कारवाई केली जाईल, असे धमकावले होते. दरम्यान, या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं