जाहिरात

Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं

त्याच अनुषंगाने पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता औसा तांडा येथे जाऊन चौकशी सुरू केली.

Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं
  • लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर एका व्यक्तीला पोत्यात बांधून कारमध्ये जिवंत जाळण्यात आले
  • मृत व्यक्तीचे नाव गणेश चव्हाण असून तो फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत होता.
  • घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा केला, प्रेताची ओळख पटवणे कठीण झाले, पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण करण्यात आली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
लातूर:

त्रिशरण मोहगावकर 

एक धक्कादायक आणि तेवढीच अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीस पोत्यात बांधण्यात आलं. त्यानंतर त्याला कारमध्ये कोंबण्यात आलं. हे प्रकरण ऐवढ्यावरच थांबलं नाही. कारसह त्या व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं. ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर सर्वच जण हादरले आहे. या आगीत त्या व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर पोलीसांचीही झोप उडाली. 

या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश चव्हाण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तो एका फायनान्स कंपनीत ( ICICI ) वसुलीचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून गेली होती. आगीत होरपळून त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 

नक्की वाचा - Nitin Nabin: भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झालेले नितीन नवीन कोण आहेत? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?

प्रेताची सुद्धा राख झाली होती. त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटवणे सुद्धा कठीण झाले होते. प्रेताची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी घटनास्थळावरच दुपारी पंचनामा केला. त्यानंतर पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण केली.  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. घटनास्थळी सापडलेल्या कारच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. ही कार औसा तांडा येथील असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनधारक आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. 

नक्की वाचा - Satara News: उडता महाराष्ट्र! साताऱ्यात ड्रग्ज कारखाना, ड्रग्ज कारखान्याचं थेट उपमुख्यमंत्र्यांशी कनेक्शन?

त्याच अनुषंगाने पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता औसा तांडा येथे जाऊन चौकशी सुरू केली. त्यामुळे सदर व्यक्तीचे नाव कळण्यास मदत झाली. या हत्येमागे नेमके काय कारण आहे हे समजू शकले नाही. मात्र यामागे आर्थिक व्यवहार वसुलीचा वाद की आणि कोणता गुन्हेगारी गट आहे याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी ही घटना अत्यंत नियोजित आणि क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास औसा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.  आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या भीषण घटनेमुळे औसा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com