जाहिरात

Jalna News: जालन्यातील नराधमाला फाशीच! राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला, 13 वर्षांपूर्वी केलेलं राक्षसी कृत्य

2012 मध्ये जालन्यातील इंदिरानगर परिसरात  चॉकलेटचे आमिष दाखवून या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती.

Jalna News: जालन्यातील नराधमाला फाशीच! राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला, 13 वर्षांपूर्वी केलेलं राक्षसी कृत्य

लक्ष्मण सोळुंके, जालना:

Jalna News: जालन्यामध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीची दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. त्यामुळे आरोपी रवी अशोक घुमरे याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. 2012 मध्ये जालन्यातील इंदिरानगर परिसरात  चॉकलेटचे आमिष दाखवून या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्यात 2012 मध्ये एका 2 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीची दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. रवी अशोक घुमरे असे या आरोपीच नाव असून त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर आरोपीने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. राष्ट्रपतींनी त्याची ही दया याचिका नोव्हेंबर २०२५ रोजी फेटाळली होती.

Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं

 ६ मार्च २०१२ रोजी जालना शहरातील इंदिरानगर परिसरात घुमरे याने चॉकलेटचे आमिष दाखवून पीडित मुलीचं अपहरण केले होते.  त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली होती. या घटनेने लोकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आरोपीना कठोर शिक्षा व्हावी म्हणून निदर्शनेही झाली होती. 

राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली

दरम्यान, सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून १६ सप्टेंबर २०१५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०१६ मध्ये त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपीने सर्व मर्यादा ओलांडल्या अस म्हणत सर्वोच्च न्यायालयही संतापले होते. आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. 

Vasai Crime: अपहरण, अत्याचार, हत्या.. 18 वर्षांनी आरोपी गजाआड; 'क्राईम ब्रँच युनिट 2'ची धडाकेबाज कारवाई

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com