मध्य प्रदेशचे राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने यूट्युबवर व्हिडीओ पाहून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या कशी करावी यासाठी या तरुणाने यूट्युबवर अनेक व्हिडीओ पाहिले. त्यानंतर नायट्रोजन सिलिंडरचा वापर करुन त्याने आयुष्य संपवलं आहे. सिद्धार्थ खुराना असं मृत तरुणाचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने चेहऱ्यावर त्याने एक प्लस्टिक पिशवी बांधली. सोबत तोंडात नायट्रोजन सिलिंडरचा पाईप लावला. त्यानंतर गॅस सुरु केला. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. भोपाळमधील त्याच्या मित्राने पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या अंदाजानुसार सिद्धार्थ दोन दिवस घरातून बाहेर नव्हता पडला.
(नक्की वाचा: गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या)
सुसाईड नोटमध्ये काय?
पोलिसांना घटनास्थळी चार पानांची सुसाईड नोट देखील मिळाली. आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, मात्र काहीच करता आलं नाही. सगळीकडून अपयश येत होतं, असं या तरुणाने लिहिलं. आत्महत्येसाठी यूट्युबवर त्याने अनेक व्हिडीओ देखील पाहिल्याचं त्याने नोटमध्ये लिहिलं.
सिद्धार्थ दोन दिवस दिसला नाही म्हणून त्याच्या मित्राने त्याला फोन केला. मात्र त्याने फोनही न उचल्याने मित्र घरी गेला. घरही आतून बंद असल्याने त्याला संशय आला. त्यावेळी त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने दरवाजा तोडला. त्यावेळी सिद्धार्थचा मृतदेह घरात आढळला.
(नक्की वाचा : अदलाबदल भोवली, पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर मोठी कारवाई)
मृत सिद्धार्थ त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तिथे राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड घरी गेली होती. तेव्हापासून हा तरुण एकटाच होता. सिद्धार्थ आयटी कंपनीत नोकरीला होता. पोलीस आता सिद्धार्थच्या मैत्रिणीची माहिती घेत आहेत.
40 सेकंदात मृत्यूचा मार्ग निवडला
सिद्धार्थने यूट्युबच्या मदतीने 40 सेकंदात मृत्यूचा मार्ग निवडला. मित्राने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होता. घरात मानसोपचार तज्ज्ञांचं एक प्रिस्क्रिप्शनसोबत काही औषधे देखील मिळाली आहेत.