जाहिरात
Story ProgressBack

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष सुटका

बहुचर्चित रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीम यांना दिलासा देत निर्दोष मुक्तता केली आहे.

Read Time: 2 mins
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष सुटका
पंजाब:

बहुचर्चित रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीम यांना दिलासा देत निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सीबीआयच्या न्यायालयाने राम रहीम यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी  जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात राम रहीम यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 

डेरेचा व्यवस्थापक होता रणजीत सिंह
रणजीत सिंह सिरसा हे डेरेचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. एका संशयातून 22 वर्षांपूर्वी रणजीत सिंह यांची हत्या करण्यात आली होती. रणजीत सिंह हरियाणातील कुरुक्षेत्र येथील राहणारे होते. 10 जुलै 2002 मध्ये गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. 

रणजीत सिंहांवर वाढला संशय..
एका अज्ञान साध्वाने तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक चिठ्ठी लिहिली होती. यात त्यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणात राम रहीम याचा तपास करण्याची मागणी केली होती. रणजीत सिंह यांनीच लैंगिक अत्याचाराची चिठ्ठी आपल्या बहिणीकडून लिहून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. 

नक्की वाचा - APP नं बदलला आवाज, स्कॉलरशिपचं आमिष, आदिवासी मुलींसोबत केलं भयंकर कृत्य

ही अनामिक चिठ्ठी सिरसाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी आपलं संध्याकाळचं वृत्तपत्रात 'संपूर्ण सत्य' यामध्ये प्रसिद्ध केली होती. ज्यानंतर 24 ऑक्टोबर  2002 मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. 21 नोव्हेंबर 2002 मध्ये दिल्लीतील अपोलो रुग्णालयात रामचंद्र यांचा मृत्यू झाला होता. 

2003 मध्ये सीबीआयकडे सोपवला होता तपास
पोलीस तपासात असमाधानी रणजीत सिंह यांचे पूत्र जगसीर सिंह यांनी जानेवारी 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सीबीआयकडे तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने मुलाला दिलासा देत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. तपासादरम्यान सीबीआयने राम रहीमसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. 2007 मध्ये न्यायालयाने आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. सुरुवातीला या प्रकरणात डेरामुखी यांचं नाव नव्हतं, मात्र 2003 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर 2006 मध्ये राम रहीमचे ड्रायव्हर खट्टा सिंह यांच्या वक्तव्याच्या आधारावर डेरा प्रमुखांचं नाव या हत्याकांडात सामील झालं.  

2021 मध्ये सीबीआयच्या न्यायालयाने गुरमीत राम रहीमसह पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. साध्वी लैंगिक अत्याचार प्रकरणात राम रहीम सिंह यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावली.  सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहेत. 


 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
ससूनमधील डॉक्टरांची चौकशी समिती वादात, SIT च्या अध्यक्ष डॉ. सापळेंवर काय आहेत आरोप?
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष सुटका
five bangladeshi citizens arrested for living illegally in pimpri chinchwad
Next Article
बनावट कागदपत्रे बनवली, नोकरीही मिळवली; पोलिसांकडून 5 बांगलादेशींना अटक
;