जाहिरात

Amravati News: खोटी डिग्री, बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

मशिदीजवळील आठवडी बाजार परिसरात गेल्या १२-१५ वर्षांपासून डॉ. इंद्रजीत श्रीराम सरकार हे मुळव्याध व भंगदर तज्ज्ञ असल्याचा दावा करून उपचार करत होते.

Amravati News: खोटी डिग्री, बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati Bogas Doctor:  अमरावतीमध्ये एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. हा डॉक्टर खोटी डीग्री लावून उपचार करत असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  इंद्रजीत श्रीराम सरकार असं या डॉक्टरचे नाव आहे.  याप्रकरणी अमरावती महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बोगस डॉक्टरचा पर्दाफाश.. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती महानगरपालिकाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बडनेरा परिसरातील एका कथित बोगस डॉक्टरवर धडक कारवाई केली. बोगस डिग्री लावून बडबेरा शहरातील नगीना मशिदीजवळील आठवडी बाजार परिसरात गेल्या १२-१५ वर्षांपासून डॉ. इंद्रजीत श्रीराम सरकार हे मुळव्याध व भंगदर तज्ज्ञ असल्याचा दावा करून उपचार करत होते.

Biryani Scam : बिर्याणीच्या एका प्लेटने उघड केला 70,000 कोटींचा महाघोटाळा, गुन्हेगारांनी वापरली भलतीच शक्कल

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ.. 

 ते आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करत असल्याची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार डॉ. रुपेश खडसे व डॉ. इमरान शहा यांच्या पथकाने बनावट रुग्ण पाठवून स्टिंग ऑपरेशन केले. तपासणीनंतर संबंधिताकडे कोणतेही वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र आढळले नाही.  २४ तासांची मुदत देऊनही कागदपत्रे सादर न केल्याने बडनेरा पोलिसांच्या मदतीने दवाखान्यावर छापा टाकण्यात आला.

दरम्यान, या कारवाईदरम्यान विविध औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य जप्त करण्यात आले. बडनेरा पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात बोगस डॉक्टरांना थारा दिला जाणार नाही असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

( नक्की वाचा : Loco Pilot : रेल्वेच्या चाकाची गती मंदावणार? मुंबईच्या 72 लोको पायलट्सनी उचललेल्या पावलानं खळबळ, कारण काय? )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com