भारतात क्रिप्टो करन्सीची सर्वात मोठी चोरी, 2000 हजार कोटींचे क्रिप्टो लंपास 

एवढी मोठी क्रिप्टो चोरी झाली तरीही सायबर चोरांची ओळख पटलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारतात क्रिप्टो करन्सीची सर्वात मोठ्या चोरीचा (Biggest Theft of Crypto Currency in India) उलगडा झाला आहे. 18 जुलै रोजी काही सायबर चोरांनी 2 मिलियन डॉलरचे क्रिप्टो चोरी केले. म्हणजे भारतीय चलनात जवळपास 2000 हजार कोटींची चोरी आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर चोरी मानली जात आहे. 

भारतात अद्यापही अजुनही क्रिप्टो करन्सीला मान्यता मिळालेली नाही. तरीही मोठ्या प्रमाणात क्रिप्टोची खरेदी होते आणि सरकारही क्रिप्टो करन्सीतून मिळणाऱ्या नफ्यावर टॅक्सची चांगलीच वसुली करते. मात्र याच क्रिप्टो करन्सीच्या जगात भारतातली सर्वात मोठी चोरी झाली आहे. 

भारतात WazirX या अॅपच्या माध्यामातून क्रिप्टो करन्सीची देवाणघेवाण होते. 18 जुलैला या अॅपचा वापर करणाऱ्या 200 वॉलेटमधून 2 मिलियन डॉलरचे क्रिप्टो चोरी झाले. म्हणजेच सायबर चोरांनी तब्बल 2 हजार कोटी रुपयांच्या क्रिप्टोची चोरी केली आहे. हजारो गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा फटका बसलाय. या चोरीनंतर WazirX या कंपनीने राष्ट्रीय सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतलीय. पण ही चोरी एकाच दिवसात झालेली नाही. सायबर चोर 10 जुलैपासून या चोरीची प्लॅनिंग करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

नक्की वाचा - म्हणे प्रामाणिक चोर...पेट्रोल संपलं म्हणून चोरलेली दुचाकी पुन्हा आणून ठेवली जागेवर!

चोरांनी 2000 हजार कोटी रुपये हजारो क्रिप्टो वॉलेट्समध्ये वर्गीकृत केले आहेत. सायबर सुरक्षा देणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने या पैशांचा मागोवा घेतला जातोय. एवढी मोठी क्रिप्टो चोरी झाली तरीही सायबर चोरांची ओळख पटलेली नाही. सायबर चोर क्रिप्टोमधील पैशांचं रुपांतर खऱ्या चलनात करतील तेव्हाच चोरांना पकडणं शक्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जास्त नफा मिळवण्यासाठी अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई क्रिप्टोमध्ये गुंतवली. पण आता हजारो गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार का याबाबत मोठी शंका आहे.