Bihar Crime: संतापजनक! होमगार्ड भरतीवेळी तरुणी बेशुद्ध पडली, रुग्णालयात नेताना नराधमांनी लचके तोडले

तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने महिलेला मगध मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले. यावेळी रुग्णवाहिकेत तिच्याशी चालक आणि आणखी एकाने तिच्याशी दृष्कृत्य केले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

बिहार: बिहारमधील गयाजी येथे होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवारावर अत्याचार झाल्याचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. बोधगया येथील बीएमपी-३ च्या क्रीडा मैदानात महिला होमगार्ड्स भरतीची मैदानी चाचणी सुर होती. यावेळी धावत असताना महिला उमेदवार अचानक बेशुद्ध पडली, तिला रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोधगया येथील बीएमपी-३ च्या क्रीडा मैदानात होमगार्ड भरतीसाठी मैदानी चाचणी सुरु होती. पिडीत तरुणी मैदानावर धावत असतानाच चक्कर आल्याने बेशुद्ध पडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने महिलेला मगध मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले. यावेळी रुग्णवाहिकेत तिच्याशी चालक आणि आणखी एकाने तिच्याशी दृष्कृत्य केले. 

Buldhana : गाय चोरल्याचा संशय, धर्म विचारुन तरुणाला झाली मारहाण! महाराष्ट्रातील खळबळजनक घटना

पिडितेने डॉक्टर आणि पोलिसांना सांगितले की रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञ यांनी बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आणि पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी माहिती दिली आहे की दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच, पीडितेची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.

 यासोबतच पोलिसांनी सांगितले की हे प्रकरण खूप गंभीर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होणार नाही. या घटनेत इतर कोणी सहभागी आहे का हे देखील तपासले जात आहे. संबंधित महिला उमेदवार गयाजी जिल्ह्यातील इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. रुग्णवाहिका चालक विनय कुमार आणि तंत्रज्ञ अजित कुमार यांना अटक करण्यात आली आहे.  दरम्यान,  पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजसह अनेक पुरावे गोळा केले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, इतर महिला उमेदवारांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Crime News: CBI ची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम रॅकेट उध्वस्त, 3 अटकेत

Topics mentioned in this article