Police Robbery Crime News : बिहारच्या मोतीहारी येथे पोलिसांच्या खाकीला डाग लागल्याची एक घटना घडली आहे. अरेराज डिएसपींचे दोन बॉडीगार्ड आणि संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पैसे चोरण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.छापेमारी दरम्यान पैसे चोरी करण्याच्या आरोपाखाली या पोलिसांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार,एसडीपी उमंगसोबत मिळून पोलिसांनी सर्वात आधी मुजफ्फरपूरमध्ये अरविंद शाह यांच्या घरी छापा टाकला.पण त्याआधीच तो फरार झाला होता.त्यानंतर चंदन सिंहच्या घरी छापा टाकला.याच दरम्यान काही पोलीस कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर काम केलं.
मोतिहारीचे पोलीस निघाले चोर
गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच छापेमारी दरम्यान चोरी करताना पकडलं गेलं.धक्कादायक बाब म्हणजे, अरेराज डिएसपींचे दोन बॉडीगार्ड आणि संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3 लाख रुपये जप्त केले आहेत.हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशच्या एक सोन्याच्या व्यापाराकडे झालेल्या 19 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाशी जोडलेलं आहे.
नक्की वाचा >> महिलेनं धावत्या ट्रेनमध्ये शिजवली मॅगी! Video व्हायरल होताच मध्य रेल्वेने उचललं कठोर पाऊल
सोनं विक्रेत्याला गावात बोलावलं अन् नंतर घडलं..
दोन दिवसांपूर्वी गोबिंदगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रढिया गावात सोनं विक्री करण्याच्या हेतूने सोने व्यापाराला बोलावण्यात आलं होतं.त्यावेळी एक व्यक्तीने त्यांच्यासोबत मारहाण करत त्यांच्याजवळ असलेले 19 लाख रुपये लुटले. घटनेची माहिती मिळताच गोबिंदगंज पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. त्यानंतर पोलिसांनी एक पोलीस कर्मचारी सुरेंद्र दास यांना अटक केली.आरोपी सुरेंद्र हरसिद्धी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कन्छेदाव गावातील रहिवासी आहे, असं समजते.
नक्की वाचा >> 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल', पत्नीच्या डिलिव्हरीच्या दिवशी कर्मचाऱ्याला सुट्टी नाही, मॅनेजरवर लोक भडकले
चोरट्यांनी 20 नोव्हेंबरला व्यापाऱ्याला एका ठिकाणी बोलावून त्याच्याकडील रोख रक्कम लुटली.एवढेच नाही तर त्याची सोन्याची चेन आणि मोबाईलही हिसकावून घेतला. त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलिसांनी एक टीम तयार करून आरोपी सुरेंद्र दासला पकडले.त्याच्याकडे चौकशी केली असता, टोळीबाबत धक्कादायक माहिती उघड झालीय. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलं आहे.