तोतया CBI अधिकाऱ्यांकडून भाजप नेत्याच्या पत्नीची फसवणूक, कारवाई रोखण्यासाठी पैसे पाठवले अन्... 

गुन्हा दाखल करायचा नसेल तर पैसे द्या अशी मागणी या तोतया अधिकाऱ्यांनी घाटगे यांच्याकडे करण्यात आली होती.

Advertisement
Read Time: 1 min
कोल्हापूर:

कोल्हापुरात भाजप नेत्याच्या पत्नीला बोगस कस्टम आणि सीबीआय अधिकार्‍यांनी वीस लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. समरजीत सिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांना हा गंडा घालण्यात आला आहे. मलेशियात पाठवण्यात आलेल्या पार्सलमधील अमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट प्रकरणी कस्टम आणि सीबीआय अधिकारी असल्याचे काही तोतयांनी घाटगे यांना सांगितले. 

हा गंभीर गुन्हा असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी भीती घाटगे यांना दिली. तुम्ही केलेला गुन्हा गंभीर असून तो दाखल करायचा नसेल तर पैसे द्या अशी मागणी या तोतया अधिकाऱ्यांनी घाटगे यांच्याकडे केली. त्यानंतर घाटगेंनी या तोतया अधिकाऱ्यांना वीस लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने दिले. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच नवोदिता घाटगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिली. फिर्यादीनुसार अनिल यादव आणि अजित (पूर्ण नाव अद्याप समजलेलं नाही) यांच्यासह कस्टम अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे.