पुणे हादरलं! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला 

पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त आज 9 डिसेंबर रोजी दुपारी समोर आलं होतं.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त आज ९ डिसेंबर रोजी दुपारी समोर आलं होतं. त्यामुळे टिळेकर कुटुंब चिंतेत होतं. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या मामाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आमदार योगेश टिळेकरांचे अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला आहे.

नक्की वाचा - आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भरचौकातून अपहरण, पोलिसांकडून शोध सुरू 

आमदार टिळेकरांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळ वाडीतून अपहरण करण्यात आल्याची माहिती आज दुपारी समोर आली होती. आज ९ डिसेंबर रोजी  सकाळच्या सुमारास सतिष वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. तेव्हा एक चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा त्यांचा शोध घेत आहे.