Malegaon Crime : श्रीरामनगर स्मशानभूमीत अघोरी कृत्याने खळबळ, चितेच्या राखेवर...

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल...मालेगाव श्रीरामनगर स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यविधी झालेल्या महिलेच्या चितेच्या राखेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच सहा ठिकाणी नागाच्या फणीच्या आकाराचे खिळे टोचून अघोरी प्रकार करण्यात आल्याचे दिसून आले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात राहणाऱ्या 75 वर्षीय जमुना बापू पाटील यांचे शनिवारी 15 मार्च रोजी निधन झाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. आज तिसऱ्या दिवशी सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईक स्मशान भूमीत आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आजूबाजूच्या परिसरात अशाच प्रकारच्या वस्तू आढळून आल्या आहेत. यापूर्वीही अघोरी कृत्याचा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा - Beed Crime : 'ही माणसं आहेत की जनावरं?' बीडमध्ये 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, 2 दिवस डांबून जबर मारहाण

Advertisement

या घटनेमुळे स्मशानभूमीतील अंत्यविधी झालेल्या चितेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईंकानी केली आहे..