इंदापूर आणि अहमदनगरची घटना ताजी असताना कोकणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जाणारी बोट बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तिघांनी पोहून किनारा गाठला, तर दोन खलाशी बेपत्ता आहेत. मदत कार्यादरम्यान दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत.
समुद्रात ढगांच्या कडकडाटासह जोरदार वारा सुटल्याने बोट भरकटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सात खलाशी एक लहान होडीत माशांसाठी लागणारा वर्ष आणि इतर साहित्य घेऊन समुद्रात उतरले होते. ते मोठ्या लॉन्चवर जात होते. यादरम्यान रात्री नऊवाजेदरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे बोट पाण्यात उलटली. यातील तीन खलाशांनी पोहून किनारा गाठला. तर दोघांचे मृतदेह सापडले असून आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे.
नक्की वाचा - महाराष्ट्र हादरला! 4 दुर्घटनांत 20 जणांचा बुडून मृत्यू
गेल्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोट बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तब्बल 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे धरण, समुद्र आदी ठिकाणी जाताना नागरिकांनी अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world