भीमा नदीत बोट बुडाली; 'ते' सहाजणं अद्याप बेपत्ता, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोहत किनाऱ्यावर!

वादळी वाऱ्यामुळे इंदापूर तालुक्यातील कळाशी गावच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक भयानक घटना घडली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
इंदापूर:

वादळी वाऱ्यामुळे इंदापूर तालुक्यातील कळाशी गावच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक भयानक घटना घडली आहे. करमाळा तालुक्यातील कुगावमधून इंदापूर तालुक्यातील काळशीकडे एक बोट प्रवाशांना घेऊन येत होती. यावेळी जोराचा वारा सुटल्याने ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली गेली.

या बोटीत जवळपास सात प्रवासी होते. त्यापैकी एक प्रवासी हा पोहून पाण्यातून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचलाय तर इतर सहा प्रवाशांचा 21 मेपासून शोध सुरू आहे. अद्याप या सहा जणांचा शोध लागलेला नाही. अंधार असल्यामुळे रात्री नऊ वाजताच्या सुमारास शोध कार्यात अडथळा येत असल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती. आता सकाळी सात वाजल्यापासून ही शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काळाशी गावच्या या भीमा नदीच्या पायथ्याशी एनडीआरएफ पथक शोध मोहीम करतील. जे प्रवासी बेपत्ता आहेत, त्यामध्ये तीन पुरुष एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे पोहत नदी पात्राच्या बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - आईनं पाय धरले, भावानं... संभाजीनगरच्या 'सैराट' प्रकरणात माय-लेकरांचा झाला फैसला

सांगलीत दोघांचा बळी
सांगली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने दोघांचा बळी घेतला आहे.शिराळा तालुक्यातल्या गिरजवडे आणि मिरज तालुक्यातल्या चाबुकस्वारवाडी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अंगावर वीज पडून दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.शिराळयाच्या गिरजवडे येथे जनावरे चरवण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण शेळके व 57 यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मिरज तालुक्यातल्या चाबुकस्वारवाडी येथे शेतात विहीर खोदणाऱ्या कामगारांच्या अंगावर वीज पडल्याने 1 जण ठार तर 2 कामगार जखमी झाले आहेत.सुभाष नाईक वय 42 असे ठार झालेल्या कामगारचे नाव आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसात वीज अंगावर पडून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
 

Advertisement