अभिषेक मुठाळ, मुंबई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे. यूट्युबवर व्हिडीओ अपलोड करत बिश्नोई गॅंग नावाने ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील बुंदीमधून अटक केली आहे.
बनवारीलाल गुज्जर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीला मुंबईत आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.
(नक्की वाचा- पत्रक, स्कॅनर, बायबल अन् पाच महिला; पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनवारीलाल गुज्जर याने सलमान खानला व्हिडीओद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुज्जराने हायवेवर उभं राहून एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये तो बिश्नोई गँगच्या मदतीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे. आरोपीने हा व्हिडीओ 'अरे छोडो यार' या यूट्युब चॅनलवर पोस्ट केला होता.
(नक्की वाचा - किळसवाणा प्रकार, ऑनलाइन आईस्क्रिम अन् कोनमध्ये माणसाचं तुटलेलं बोट; महिलेला बसला धक्का!)
मुंबई पोलिसांच्या हा व्हिडीओ निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. रविवारी दुपारी आरोपीला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला मुंबईत आणलं जाणार आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 506(2), 504, 34 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.