अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात एका 'मामा'चं नाव समोर आलं आहे. बिश्नोई गँगमध्ये अखेर हा मामा कोण आहे? याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचनं चार्जशीट दाखल केलीय. त्यामध्ये अनमोल बिश्नोई आणि शूटर विक्की कुमार गुप्ता यांच्यात 9 मिनिटं झालेल्या चर्चेच्या ट्रान्सक्रिप्टचा समावेश आहे. दोघांच्या बोलण्यात एका मामाचं नाव सतत ऐकू येतंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनमोल आणि दोन्ही शूटर्समधील चर्चेचं ट्रान्सक्रिप्ट
- अनमोल बिश्नोई : माझी मामाबरोबर चर्चा झाली आहे. ते सांगत आहेत की, हे करु नका. सरेंडर होऊ नका. सरेंडर देवासमोर करा. अन्य कुणासमोर करण्याची गरज नाही.
- विक्की कुमार गुप्ता - तुम्ही आत्ता मामाशी बोलला का?
- अनमोल बिश्नोई - माझं मामाशी बोलणं झालं आहे.
- विक्की कुमार गुप्ता: आत्ता मामाशी बोलला. माझा दुसरा भाऊ, भाईजीसारखेच तुम्ही तुम्ही आणि लॉरेन्स सर भाऊ आहात. मी माझ्या भावाला तुमचा नंबर पाठवत आहे. मी त्याचा नंबर तुम्हाला पाठवत आहे. मी जर आगामी काही दिवसांमध्ये पकडला गेलो, तर त्याच्याशी संपर्क करु. माझं मामासोबतही बोलणं झालंय. मी माझ्या भावाला देखील आपलं सर्व बोलणं सांगितलं आहे.
कोण आहे मामा?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मामा या शूटर्सचा हँडरल आहे. या हँडलरला लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईनं शूर्टसना रिक्रूट करण्याची जबाबदारी दिली होती. याच हँडलर्सनी विक्की कुमार आणि सोनूला हे काम दिलं होतं. आता पोलीस मामाचा शोध घेत आहेत.
( नक्की वाचा : हमासच्या प्रमुखांचा 2 महिने वाट पाहात होता मृत्यू, त्या दिवशी नेमकं काय घडलं? Inside Story )
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्सचे ऑडिओ टेप प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यावेळी अनमोल बिश्नोई यांनी त्यांना तुम्ही आयुष्यातील सर्वा चांगलं काम करत आहात, असं सांगितलं होतं. तुम्ही हे काम चांगल्या पद्धतीनं करा. हे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इतिहास लिहिणार आहात. हे काम करताना अजिबात घाबरु नका. हे काम करण्याचा अर्थ समाजात बदल करणे आहे,' असं अनमोलनं सांगितल्याचा या 1,735 पानांच्या चार्जशीटमध्ये उल्लेख आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 14 एप्रिल रोजी दोन मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर ते फरार झाले. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं घेतली होती. पोलिसांनी हा गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्याचा कट ऑक्टोबर 2023 मध्ये रचण्यात आला होता, अशी माहिती तपासात उघड झाली.
हल्ल्यातील सूत्रधारांच्या सांगण्यानुसार शूटर विक्की गुप्ता आणि सागर पालने पनवेलमध्ये एक घर किरायानं घेतलं होतं. तिथंच त्यांंनी एक बाईक घेतली. काही दिवसांनी दोन्ही शूटर्सना पिस्तूल देण्यात आली. त्यांनी सलमानच्या घराची रेकी केली होती.