अमेरिकेतून लग्न ठरवण्यासाठी भारतात आलेल्या तरुणाची एका मेट्रोमोनियल साईटवरून पुण्यातील तरुणीसोबत लग्नगाठ पक्की झाली होती. त्यानुसार साखरपुडाही झाला. मात्र या वराने आपल्या होणाऱ्या पत्नीचे इतर मुलांबरोबरचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या फोनमध्ये पाहिले. त्यामुळे नियोजीत वरानं लग्नास नकार दिला. मात्र हा नकार पचवता न आल्याने मुलीने आणि तिच्या भावाने वरालाच ब्लॅकमेल करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याला धमक्या देखील दिल्या.
या प्रकरणात वराने पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली. याच प्रकरणी आरोपी भावाला न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. हे आदेश न जुमानता आरोपी फरार झाला होता. त्याने अटकपूर्वक जामीनासाठी अर्ज देखील केला होता. दिंडोशी सेशन कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मिलिंद बोरकर 2007 पासून अमेरिकेत एका नामांकित कंपनीत काम करत होता. 2019 मध्ये तो लग्नासाठी मुंबईत आला. त्यानंतर एका मैट्रीमोनियल साइटवर त्याची ओळख पुण्यातील पिंपरीतील मोरवाडी भागातील पल्लवी गायकवाड सोबत झाली, आणि जून 2019 मध्ये तिच्या सोबत साखरपुडा झाला. मात्र, लग्नापूर्वी मिलिंद याने पल्लवीच्या फोनमध्ये तिच्या इतर मुलांसोबत अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाहिले. हे पाहिल्यानंतर मिलिंदनी पल्लवीसोबत साखरपुडा मोडला. साखरपुडा मोडल्यामुळे नाराज झालेल्या पल्लवीने आणि तिच्या कुटुंबीयांनी मिलिंद कडून पल्लवीसोबत 6 महिन्यांसाठी लग्न करायचं किंवा 25 लाख रुपये देण्याची मागणी केली. याशिवाय जर असं न केल्यास मिलिंदला खोट्या प्रकरणात अडकवण्याची आणि त्यांच करिअर बर्बाद करण्याची धमकी दिली.
हे प्रकरण इथंच थांबलं नाही. पल्लवीने मिलिंदच्या विरोधात पुण्यातील पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांची बदनामी केल्याचा आरोप केला. तसेच अमेरिकेत मिलिंद यांच्या कंपनीला आणि भारतीय व अमेरिकन इमिग्रेशनला खोटी माहिती देऊन मिलिंद यांच्या विरोधात FIR नोंदवलेली आहे असं कळवलं. त्यामुळे मिलिंद बदनामीमुळे अमेरिकेत इतर कोणासोबतही लग्न करू शकणार नाहीत, असं भासवलं. मात्र, तपासात सत्य उघड झाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी मिलिंद यांच्याविरोधात खोटी FIR नोंदवणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं.
( नक्की वाचा : म्हशींना दिलं जातंय भयंकर इंजेक्शन, दूधातून कॅन्सरचाही धोका! कल्याणमधील धक्कादायक प्रकार )
दरम्यान, मिलिंद यांनी मुंबईतील अंधेरी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टापासून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टापर्यंत कायदेशीर लढाई लढली. कोर्टासमोर मुलीचे इतर मुलांसोबतचे अश्लील फोटो, व्हिडिओ, व्हॉट्सअप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग सादर केले. या पुराव्यांच्या आधारे अंधेरी कोर्टाने पोलिसांना मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात मुलीसह तीन आरोपी जामिनावर सोडले आहेत, तर पोलिसांना अद्याप पल्लवीच्या भावाचा शोध लागलेला नाही.
दरम्यान, यापूर्वी मुंबईच्या अंधेरी मेट्रोपोलिटन कोर्टाच्या आदेशानुसार वर्सोवा पोलिसांनी पल्लवी गायकवाड, तिचे वडील चंद्रकांत गायकवाड, भाऊ प्रतीक गायकवाड आणि संजीव सोनवणे यांच्याविरुद्ध IPC च्या कलम 389, 385, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
( नक्की वाचा : 'मी तिला मारले नसते तर..' गर्लफ्रेंडचे 59 तुकडे करुन फ्रिज ठेवणाऱ्या मृत आरोपीच्या नोटमधून ट्विस्ट )
अंधेरी कोर्टने जारी केलेल्या समन्सनंतरही आरोपीने न्यायालयात हजर न राहिल्यामुळे कोर्टाने आरोपीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. यानंतर आरोपीच्या वतीने सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान बोरकर यांचे वकील संजय शुक्ला यांनी याचिकेचा विरोध करत आरोपी प्रतीक आणि पल्लवीच्या मोबाईल फोन सादर करण्याची मागणी केली, ज्यामुळे डेटा चोरीच्या आरोपांची तपासणी होऊ शकेल. आरोप असा आहे की, फोन सादर केल्यास बनावट आरोप उघड होतील, या भीतीमुळेच प्रतीक न्यायालयासमोर हजर झाला नाही. त्यामुळे शेवटी सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली.