इंग्लंड धुमसतंय; इतकी मोठी दंगल का उसळली, एका अफवेने परिस्थिती बिघडली? 

इंग्लंडमधील अल्पसंख्यांक, प्रवासी आणि त्यातही मुसलमान निशाण्यावर आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
इंग्लंड:

इंग्लंडमध्ये 31 जुलैपासून सुरू झालेली दंगलीची परिस्थिती अद्यापही कायम आहे. दिवसेंदिवस येथील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. परणामी इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पोलिसांना आंदोलनकाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये रक्तरंजित संघर्षाचं नेतृत्व येथील अति उजव्या विचारसरणीचे नेते करीत आहे. (Britain Violence)

दंगलीचं कारण काय?
इंग्लंडमधील अल्पसंख्यांक, प्रवासी आणि त्यातही मुसलमान निशाण्यावर आहेत. इंग्लंडमध्ये असं काय झालं की, देशातील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि गोंधळ घालू लागले. या संपूर्ण घटनाक्रमामागे तीन मुलींच्या हत्येचं कारण सांगितलं जात आहे. 

डान्स पार्टीमध्ये तीन मुलींची हत्या...
मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या काऊंटी मर्सिसाइडमध्ये एका डान्स पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत अमेरिकेतील प्रसिद्ध गायक टेलर स्विफ्ट आली होती. या पार्टीत तीन मुलींची हत्या करण्यात आली होती. ज्या व्यक्तीविरोधात मुलींच्या हत्येचा आरोप लावला होता, तो मुस्लीम असल्याचं सांगितलं जात आहे. हत्या करणारा 17 वर्षाचा अल्पवयीन आणि त्याचे आई वडील रुआंडाचे आहेत. हत्या करणारा हा मुस्लीम स्थलांतरीत असल्याची अफवा पसरली आणि दंगली उसळल्या.  यानंतर इंग्लंडमध्ये अचानकपणे हिंसाचार वाढला. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव एक्सल मुगनवा रुदाकुबाना असल्याचं सांगितलं जात आहे. या तीन मुलींच्या हत्येनंतर सोशल मीडियावर एक अफवाही पसरली. पार्टीत मुलींची हत्या करणारी व्यक्ती कट्टरपंथी इस्लामबादी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Advertisement

हजारोंच्या संख्येने लोक आले एकत्र...
बुधवारी 31 जुलै रोजी इंग्लंडमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक पीएम निवासस्थानासमोर जमा झाले. यावेळी आमच्या मुलांना वाचवा, आम्हाला आमचा देश परत हवाय, प्रवाशांना थांबवा अशा घोषणाबाजी केल्या जात होत्या. इंग्लंडच्या ज्या शहरांमध्ये हिंसाचार पसरला त्यात लिव्हरपूल, हल, ब्रिस्टल, लीड्स, ब्लॅकपूल, बेलफास्ट, स्टोक-ऑन-ट्रेंट, नॉटिंघम आणि मॅनचेस्टर आदी नावांचा समावेश आहे.