महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याचं नाव नाही. आता मालवणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका महिलेला भर दिवसा जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ती ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणी आरोपी पेट्रोल घेवून गेला. तिथेच त्याने सर्वां समोर ते पेट्रोल तिच्या अंगावर टाकले. हातात असलेल्या लायटरने तिला पेटवून दिले. त्यानंतर ही महिला धावत बाहेर गेली. बस स्थानकात असलेल्या लोक तिच्या मदतीसाठी धावले. भर दिवसा झालेल्या या घटनेने सर्वच जण हादरून गेले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मालवण बस स्थानकासमोरील केजी डायग्नोस्टिक सेंटर ही लॅब आहे. या लॅबमध्ये प्रीती केळूसकर ही महिला काम करते. त्या मालवणच्या धुरीवाडा इथे राहातात. त्यांचे धुरीवाडा येथील एका व्यक्ती सोबत लग्न झाले होते. मात्र त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेने अलीकडे काही महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. याचा राग तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मनात होता. या रागातूनच तो ती काम करत असलेल्या लॅबमध्ये पोहोचला.
नक्की वाचा : अत्यंत खेद होत आहे! संभाजी ब्रिगेडचे उद्धव ठाकरेंना पत्र
त्यावेळी त्याच्या हातात पेट्रोलने भरलेली बाटली होती. त्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले. त्यानंतर हातातील लायटरने तिला आग लावली. तिने लगेच पेट घेतला. त्यानंतर तो पळून गेला. लॅबमध्ये काही समजण्या आत गोंधळ उजाला. काय करावे काय करून नये हे कोणालाच समजले नाही. शेवटी पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर धावत गेली. त्यावेळी तिथे उभे असलेले लोकही घाबरून गेले. त्यांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवली.
नक्की वाचा : 'मी माझे शब्द मागे घेते' कंगनाचा'त्या' वक्तव्यावरून यू टर्न, भाजपमध्येच वाद
त्यात ती मोठ्या प्रमाणात भाजली होती. लगेचच तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री तिचे निधन झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा हा प्रकार घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहे. हा प्रकार तिच्या पहिल्या पतीने केल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला.
नक्की वाचा - Sanjay Raut संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा, प्रकरण नेमके काय आहे ?
या घटनेने पोलिसही हादरून गेले. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर आरोपीला शोधणं आव्हान होतं. शिवाय या घटनेत त्या महिलेचा ही मृत्यू झाला होता. पेट्रोल टाकून तिचा पहिला पती फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती. त्यानंतर सुशांत सहदेव गोवेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. कुंभारमाठ येथे तो लपून बसला होता. त्याने हे कृत्य का केले आहे याचा शोध आता पोलिस घेत आहेत.