जाहिरात

'मी माझे शब्द मागे घेते' कंगनाचा'त्या' वक्तव्यावरून यू टर्न, भाजपमध्येच वाद

हरियाणा विधानसभेची निवडणूक होत आहे. त्याच वेळी कंगना यांनी कृषी कायद्या बाबत वक्तव्य केले आहे. जे कृषी कायदे रद्द करण्याच आले ते पुन्हा लागू करावे अशी मागणी कंगना यांनी केली.

'मी माझे शब्द मागे घेते' कंगनाचा'त्या' वक्तव्यावरून यू टर्न, भाजपमध्येच वाद
दिल्ली:

अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत या नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहील्या आहेत. त्यांनी नुकतेच कृषी कायद्यांबाबत वक्तव्य केलं होतं. (Kangana On Farm Laws) कृषी कायदे पुन्हा: लागू करावेत अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. भाजपनेही त्यांच्या यावक्तव्याला विरोध दर्शवत पक्षातर्फे त्यांना अशी विधाने करण्याचा हक्क दिलेला नाही असं पक्षांना सांगत त्यांच्यापासून अंतर ठेवले आहेत. त्यामुळे त्या पक्षातच एकट्या पडल्या आहेत. अशा स्थिती कंगना यांनी यु टर्न घेत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे काँग्रेसनेही आता भाजप आणि कंगना यांना घेरले आहे.      

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हरियाणा विधानसभेची निवडणूक होत आहे. त्याच वेळी कंगना यांनी कृषी कायद्या बाबत वक्तव्य केले आहे. जे कृषी कायदे रद्द करण्याच आले ते पुन्हा लागू करावे अशी मागणी कंगना यांनी केली. कंगना यांच्या या वक्तव्यावर भाजपनेच टिका केली आहे. कंगना यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तीक आहे. त्याचा पक्षाशी काही संबध नाही. त्यांना पक्षा तर्फे कोणतेही वक्तव्य करण्याचा कोणताही अधिकार दिलेला नाही. असे भाजप नेते गौरव भाटिया यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय कंगना यांनी केलेल्या वक्तव्याला भाजपचा पाठींबा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा शब्दात कंगना यांना भाटिया यांनी फटकारले आहे.  
 

यानंतर कंगना यांनाही पुढे येवून स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. कंगना आधी म्हणाल्या होत्या की मी जे वक्तव्य करत आहे ते विवादास्पद असू शकते. पण मला असं वाटतं की जे कृषी कायदे रद्द करण्यात आले ते परत आणणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीच त्यासाठी मागणी केली पाहीजे. शेतकरी हे देशाच्या विकासाचे स्तंभ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मी आवाहन करते की त्यांनी कृषी कायदे लागू करण्याची मागणी करावी. असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

ट्रेंडिंग बातमी - 'हा एन्काउंटर नाही', अक्षय शिंदे प्रकरणात उच्च न्यायालयाचं पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

मात्र त्यांच्या या वक्तव्यावर टिकेची झोड उठली होती. हरियाणा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे हे वक्तव्य पक्षासाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे भाजप नेते गौरव भाटिया यांनी कंगना यांचे कान टोचले. त्यानंतर कंगना यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. कृषी कायद्याबाबत जे वक्तव्य मी केले ते माझे वैयक्तीक मत आहे. हे भाजपचे मत नाही. पक्षाच्या मताबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही असेही त्या म्हणाले. गौरव भाटियांच्या ट्वीटला त्यांनी रिप्लाय करत हे स्पष्टीकरण दिलं आहे. 
 

Latest and Breaking News on NDTV

कंगना यांनी या आधी ही शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. शेतकरी आंदोलना दरम्यान भारतात बांगलादेश सारखी स्थिती निर्माण होवू शकते. असं ही त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान विरोधकही कंगना यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत आहेत. कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी 750 शेतकरी शहीद झाले आहेत. त्यानंतर हे कायदे मागे घेण्यात आले. आता भाजप हे कायदे पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांबरोबर आहे असे काँग्रेसने या निमित्ताने स्पष्ट केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
भाजप नेते पिचड पिता-पूत्र स्वगृही परतणार? शरद पवारांच्या भेटीनंतर रंगली चर्चा
'मी माझे शब्द मागे घेते' कंगनाचा'त्या' वक्तव्यावरून यू टर्न, भाजपमध्येच वाद
Maratha Reservation Manoj Jarange Patil hunger strike suspended on ninth day
Next Article
Maratha Reservation : नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित