जाहिरात

Kerla Crime: पुण्यातील बहीण- भावाचा हॉटेलमध्ये मृतदेह, आत्महत्या की घातपात? चिठ्ठीतून शॉकिंग खुलासा

प्राथमिक तपासात या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झालं आहे. घटनास्थळी ्सापडलेल्या चिठ्ठीमधून दोघांनी आर्थिक अडचणीमधून हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. 

Kerla Crime: पुण्यातील बहीण- भावाचा हॉटेलमध्ये मृतदेह, आत्महत्या की घातपात? चिठ्ठीतून शॉकिंग खुलासा

राहुल कुलकर्णी

: पुणे जिल्ह्यातील बहीण भावांचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. केरळमधील थंपनूर येथील एका हॉटेलच्या खोलीत दोघांचे मृतदेह आढळले असून प्राथमिक तपासात या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झालं आहे. घटनास्थळी ्सापडलेल्या चिठ्ठीमधून दोघांनी आर्थिक अडचणीमधून हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  केरळमधील थंपनूर येथील एका हॉटेलच्या खोलीत पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील दोन भावंडांचे रहस्यमय परिस्थितीत मृतदेह आढळले. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. दत्तात्रय कोंडिबा बामणे (45) आणि मुक्ता कोंडिबा बामणे (49) असे या दोघांचे नाव आहे.  हे दोघेही शिक्रापूर येथील दत्तविरार सोसायटीचे रहिवासी आहेत. दोघांनीही स्वतंत्र सुसाईड नोट्स लिहिल्या आहेत, ज्यात आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक अडचणींचा उल्लेख आहे.

(नक्की वाचा- : "विरोध करणारे बहुतेक लोक बाहेरचे", धारावीतील स्वयंसेवी संस्थांचा पुनर्विकास सर्वेक्षणाला पाठिंबा)

दत्तात्रय आणि मुक्ता हे दोघेही भाऊ- बहीण केरळला गेले होते. 17 जानेवारीला ते केरळच्या थंपनूर येथील हॉटेलमध्ये थांबले. रविवारी सकाळी त्यांच्या रुममधून कोणतीच हालचाल ऐकू आली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. अनेकदा दार ठोठावूनही कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं ज्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला, तर पुरूष बसलेल्या अवस्थेत आढळला, त्याच्या गळ्यात दोरीने बांधलेला आढळला. त्याच्या गळ्यात प्लास्टिकचे कव्हर आढळले, जे दोरीने बांधलेले होते. तपासकर्त्यांना संशय आहे की त्या भावाने  आत्महत्या करण्यापूर्वी महिलेची हत्या केली असावी, परंतु घटनांचा नेमका क्रम शवविच्छेदन तपासणीनंतरच स्पष्ट होईल, जो पुण्याहून त्यांचे नातेवाईक येईपर्यंत प्रलंबित आहे. मृतदेह मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आले आहेत.

(नक्की वाचा- Dharavi Social Mission : वर्षभरात धारावीकरांसाठी कौशल्य विकासाच्या 10 हजार आणि रोजगाराच्या 3 हजार संधी)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com