Ulhasnagar News :उल्हासनगरच्या भर चौकातून उचलले अन् माथेरानच्या लॉजवर नग्न करून अमानुष छळ! कारण काय?

Ulhasnagar Crime News: घटनेची सुरुवात 9 फेब्रुवारी रोजी रात्री झाली. तक्रारदार चिराग मीरचंदानी हे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील एका चायनीज सेंटरमध्ये जेवण करत होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ulhasnagar Crime News: भर चौकात सर्वांसमोर त्यांना मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले. (प्रतिकात्मक फोटो)
उल्हासनगर:

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये व्याजाच्या पैशांवरून एका 30 वर्षीय तरुणावर झालेला अमानुष अत्याचार पाहून संपूर्ण शहर हादरले आहे. केवळ पैशांच्या वादातून एका तरुणाचे सार्वजनिक ठिकाणाहून अपहरण करून त्याला नग्न अवस्थेत मारहाण करण्यात आली आणि त्याचे अश्लील व्हिडिओ चित्रीत करण्यात आले. 

या प्रकरणी पोलिसांनी सावकारासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या सर्व आरोपी फरार आहेत. ही घटना केवळ पैशांची वसुली नसून क्रूरतेचा कळस असल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

घटनेची सुरुवात 9 फेब्रुवारी रोजी रात्री झाली. तक्रारदार चिराग मीरचंदानी हे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील एका चायनीज सेंटरमध्ये जेवण करत होते. त्याच वेळी आरोपींनी तिथे येऊन चिराग यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला.

भर चौकात सर्वांसमोर त्यांना मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी त्यांना आधी उल्हासनगरमध्ये आणि नंतर बदलापूर येथील एका कार्यालयात नेऊन तिथेही बेदम मारहाण केली.

Advertisement

( नक्की वाचा : Satara News: साताऱ्यातील शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाखांचा गंडा,मुंबईच्या नगरसेविकेसह मंत्रालयातील 'बाबू' रडारवर! )

माथेरानमधील लॉजवर नग्न करून अत्याचार

अपहरणाचे हे सत्र एवढ्यावरच थांबले नाही. आरोपींनी चिराग यांना माथेरान येथील एका लॉजवर नेले आणि तिथे त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. तिथे त्यांना नग्न करून मारहाण करण्यात आली आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले. 

पैसे न दिल्यास त्यांचे लिंग कापण्याची धमकी चाकू दाखवून देण्यात आली. इतकेच नाही तर चिराग यांच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ करत त्यांच्यावर पैशांसाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक दबाव आणला.

Advertisement

( नक्की वाचा : Beed News: बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय? )
 

व्याजाचा जीवघेणा विळखा

या वादाचे मूळ चिराग यांनी आरोपी सावकार अमित चामुला याच्याकडून घेतलेल्या 4 लाख रुपयांच्या कर्जात आहे. चिराग यांनी यापैकी 2 लाख 50 हजार रुपये परत केले होते, मात्र सावकाराने भरमसाठ व्याज लावून पुन्हा 4 लाख 50 हजार रुपयांची मागणी सुरू ठेवली होती. चिराग यांनी ही वाढीव रक्कम देण्यास नकार दिल्याने आरोपींनी हा भयानक कट रचला. अखेर 1 लाख 25 हजार रुपये एका व्यक्तीकडे जमा केल्यानंतर चिराग यांची सुटका करण्यात आली.

या धक्कादायक प्रकारानंतर 12 फेब्रुवारी रोजी चिराग यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहिता आणि सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावकारासह 5ही आरोपी सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक बेडकुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरात बेकायदेशीर सावकारीमुळे वाढणाऱ्या या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article