Buldhana Crime: महाराष्ट्रात खळबळ! काँग्रेस नेत्याकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, बेडरुममध्ये नेलं अन्..

चिखली पोलिसात युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलढाणा:

बुलढाणा: अनैतिक संबंधाच्या संशयावरून काँग्रेस पदाधिकाऱ्याने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीसात युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सततचा कौटुंबिक वाद व अनैतिक संबंधाच्या संशयावरून विकोपाला गेलेल्या भांडणातून चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्षाने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीने समयसुचकता दाखवत पेटलेली साडी पाण्याने भिजवून आपला जीव वाचवला. 

Pune Crime: पुण्यात भाईगिरीचा अल्पवयीन पॅटर्न! गुन्हेगारी जगताचे भीषण वास्तव दाखवणारा REPORT

काल विशाल आणि पत्नी नमिता यांच्यात सुरुवातीला कौटुंबिक कारणातून वाद झालेत तितक्यात विशाल याला अज्ञात महिलेचा फोन आला. यावेळी पत्नीने कुणाचा फोन आहे? असं विचारलं असता चिडून विशालने पत्नीला बेडरूममध्ये नेले व अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र नमिताने समय सुचकता दाखवत तात्काळ पेटलेली साडी पाण्याने भिजवली व आपला जीव वाचवला याप्रकरणी पोलिसांनी विशाल सह सासू व नंदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेच्या पित्याने सांगितले की, विशाल आणि नमिताचे 2020 मध्ये लग्न झाले. तेव्हापासून तिचा छळ सुरु आहे. पती विशालचे अनेक मुलींशी संबंध आहेत. त्याचे असंख्य चॅट्स आणि अश्लील फोटो आमच्याकडे आहेत. त्याने मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी पत्नी नमिता काकडे यांनी चिखली शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून विशाल काकडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Online Fraud: परदेशात मोठ्या पगाराचे आमिष, तिथे गेल्यावर अपहरण अन् नंतर सुरू झाला भयंकर खेळ