जाहिरात

Pune Crime: पुण्यात भाईगिरीचा अल्पवयीन पॅटर्न! गुन्हेगारी जगताचे भीषण वास्तव दाखवणारा REPORT

Pune Crime Minor Gangster Report: पुण्यातील अल्पवयीन मुलांना भाईगिरीचे आकर्षण वाढताना दिसत असून त्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. 

Pune Crime: पुण्यात भाईगिरीचा अल्पवयीन पॅटर्न!  गुन्हेगारी जगताचे भीषण वास्तव दाखवणारा REPORT

Pune Crime: 'विद्येचं माहेरघर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे पुण्यातील गुन्हेगारी जगतात अल्पवयीन मुलांचा वाढता वावर धोकादायक आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरण, अलिकडचे गणेश काळे हत्या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा समावेश होता. पुण्यातील अल्पवयीन मुलांना भाईगिरीचे आकर्षण वाढताना दिसत असून त्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. 

पुण्यातील गुन्हेगारी विश्वात अल्पवयीन मुले अडकत चालल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. शहरातील अल्पवयीन मुलांमध्ये  'भाईगिरी' ) आणि 'डॉनगिरी' चे आकर्षण वाढले असून, केवळ 'फेम'  मिळवण्यासाठी ते गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत आहेत. गुन्हेगारीला 'प्रतिष्ठा' मानून या टोळ्या सोशल मीडियावर  उघडपणे आपले प्रदर्शन करत आहेत, ज्यामुळे पोलीस आणि समाजशास्त्रज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 

Success Story: नंदी बैल फिरवणाऱ्याच्या मुलाची 'सुवर्ण' झेप! परदेशात देशाचं नाव गाजवलं, वाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमधील सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत १४०० गुन्ह्यांमध्ये तब्बल २२४३ अल्पवयीन मुले गुन्हेगार म्हणून नोंदवली गेली आहेत. ही आकडेवारी पुण्यात वाढत चाललेले गँगवॉर आणि दहशत माजवण्याचे धक्कादायक वास्तव दर्शवते. 

दरम्यान, 2021 मध्ये  336, 2022 मध्ये 544,  2023- मध्ये 435, 2024 मध्ये 514,  2025 ॲक्टोबरपर्यंत 232 अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे आता या भाईगिरीकडे वळणाऱ्या मुलांना रोखण्याचे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

Pune Crime: शिक्षक बायको, संशयी नवरा अन् 'दृश्यम' स्टाईल खून, पुण्याला हादरवणारी मर्डर मिस्ट्री

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com