Buldhana News : 'माझी वाट पाहू नका'; शेअर बाजारात ट्रेडिंगमध्ये एक चूक; गणेशच्या निर्णयाने कुटुंबाची वाताहत

गणेश हा शेअर ट्रेडिंगमध्ये रस घेत असत. मात्र, अलीकडे त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे मोठं नुकसान झालं

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे नैराश्यात एका २२ वर्षीय युवकाने घर सोडल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे समोर आली आहे. गणेश शंकर बुरुकले वय २२ हा तरुण ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स, नांदुरा रोड येथून बेपत्ता झाला. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

शेअर बाजारात तोटा अन् तरुण बेपत्ता...

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा शेअर बाजारात सक्रिय होता. मात्र, अलीकडील घसरणीमुळे त्याला सुमारे ९ लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं. या आर्थिक संकटाचा त्याला इतका धक्का बसला की, त्याने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बेपत्ता होण्यापूर्वी अंदाजे दुपारी ४ वाजता त्याने एका मित्राला फोन केला. फोनवर त्याने सांगितलं की, त्याचा मोबाइल फोन आणि एक चिठ्ठी ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवली आहे. चिठ्ठीत त्याने स्पष्टपणे लिहिलं  आहे, "शेअर बाजारात मला ९ लाखांचे नुकसान झाले आहे. मी घर सोडत आहे. माझी वाट पाहू नका." ही चिठ्ठी वाचून कुटुंबीय आणि मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

गणेश हा शेअर ट्रेडिंगमध्ये रस घेत असत. मात्र, अलीकडे त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे मोठं नुकसान झालं. कुटुंबीयांकडून गणेशला शोधण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. शेजारील लोक आणि मित्रमंडळीही त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. पोलीस विभागाकडून  चिठ्ठी आणि फोन कॉलच्या आधारावर तपास सुरू आहे. युवकाच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. स्थानिक रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्येही चौकशी केली जात आहे. हे प्रकरण शेअर बाजारातील जोखमींबाबत तरुणांना इशारा देणारे आहे. या घटनेमुळे खामगाव शहरात खळबळ उडाली असून आर्थिक निर्णय घेताना काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Topics mentioned in this article