
सध्या देशभरात ईडीकडून धाडसत्र सुरू आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी ईडीने धाडी मारत अनेकांना कॅशसह रंगेहाथ पकडलं आहे. दरम्यान बुलढाण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाण्याच्या मलकापूर शहरात एका कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही कार छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरच्या दिशेने जात होती. त्यावेळी या गाडीमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत गाडीतून तब्बल 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सुरुवातीला कारमधील दोघांनी रोकडबद्दल उडवा-उडवीची उत्तरं दिली होती. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गाडीतून ही कॅश जप्त करण्यात आली.
नक्की वाचा - IPL सट्ट्याची चटक, तरुण बनला चोर ! लग्नाचं कार्ड दाखवून वृद्ध महिलेला...
सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. त्यादरम्यान ही रोकड सापडली आहे. या कारमध्ये अनेक बॅगा आढळल्या. त्यामध्ये मोठमोठे बंडलमध्ये कॅश ठेवण्यात आली होती. या बॅगेत 500 आणि एक हजाराच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. या कारमधील दोघांनी अद्याप तरी या पैशांबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world