जाहिरात

महिलेचा शिरच्छेद करून जाळलं अन् नदीकाठी फेकलं; ओळख पटविण्यासाठी बुलढाणा पोलिसांची मोठी घोषणा!

जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली होती.

महिलेचा शिरच्छेद करून जाळलं अन् नदीकाठी फेकलं; ओळख पटविण्यासाठी बुलढाणा पोलिसांची मोठी घोषणा!

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : जळगाव जामोद राजूरा येथे सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून देणाऱ्याला पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली होती. राजूरा खुर्द शेत शिवारातील शेताच्या धु-बायर निंबाच्या झाडाजवळील नदीच्या काठावर एका अज्ञात स्त्रीचा शिरच्छेद केलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला आहे.

महिलेची ओळख पटविण्यासाठी सहकार्य करण्याचं पोलिसांचं आवाहन...

अज्ञात आरोपींनी सदर महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करून तिची ओळख पटू नये, या उद्देशाने प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत या मृत महिलेची ओळख पटलेली नसून पोलीस प्रशासनाकडून सर्व जनतेला ओळख पटवण्यासाठी सहकार्य करण्याचं जाहीर आवाहन करण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - मुलाचा सांगाडा पाहून बाप ढसाढसा रडला; अडीच महिन्यांनी 12 वर्षांच्या गणेशच्या मृत्यूच्या तपासाला वेगळं वळण

पोलीस प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात आलं आहे की, मृत महिलेची ओळख पटवून देणाऱ्या किंवा अचूक माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्यास पन्नास हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. तत्काळ संपर्क साधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे क्रमांक निलेश तांबे पोलीस अधीक्षक 8527110105 श्रेणीक लोढा अपर पोलीस अधीक्षक 7058950088, अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक 9421016272, संतोष खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर – तपास अधिकारी 8459957187, पो. नि. सचिन बागुल ठाणे प्रभारी अधिकारी, जळगाव जामोद 9803219803, गणेश कडू पोउपनि, उपविपोअ, कार्यालय, मेहकर 9552468970, पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा 07262-242400 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com