शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करताय? तर सावधान! ही बातमी आधी वाचा

तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करत असाल तर आत्ताच सावध होण्याची गरज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करत असाल तर आत्ताच सावध होण्याची गरज आहे. अमरावतीच्या परतवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेअर घेणाऱ्या एका व्यक्तीला आभासी नफा दाखवून तब्बल 31.35 लाखांना गंडविल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी ग्रामीण सायबर पोलिसांनी छत्तीसगड येथून सहा आरोपींना अटक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नक्की प्रकरण काय? 

परतवाड्यातील आशिष बोबडे  यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट अनालिसिस अँड लर्निंग' या नावाचा शेअर मार्केट ग्रुप जॉईन केला होता. वेबसाईट लिंक द्वारे त्यांनी 31.35 लाखांची शेअर खरेदी केले होते. गुतवणूक केल्यानंतर मोठा फायदा होईल असे त्यांना आश्वासनही देण्यात आले. जास्त पैसे मिळणार या अमिषाने बोबडे यांनी गुंतवणुकही केली. पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ती वेबसाईट बंद दिसून आली. त्यामुळे त्यांनी ग्रुपमधील मोबाईल क्रमांकावर कॉल केला. मात्र मोबाईल ही बंद होता. त्यांनी त्या क्रमांकावर वारंवार फोन केला. पण काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे आपण फसवलो गेलोय याची कल्पना बोबडे यांना आली. त्यांनी तातडीने पोलिस स्थानक गाठलं. सायबर सेलकडे याची तक्रार दाखल केली. 

Advertisement

हेही वाचा - बापाचं 'बाप' काम! लेकीच्या लग्नातील आहेर केलं दान, कारण काय?

पोलिसांनी तपासाची सुत्र फिरवली 

सायबर पोलिसांच्या तपासात आरोपींनी वेगवेगळे मोबाईल वापरल्याचे समोर आले. त्यातून ते दिशाभूल करत होते. शिवाय त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसेही पाठवले होते. त्यानुसार पोलिसांनी त्या बँक खात्यांची साखळी जोडून तपशिलाच्या आधारावर छत्तीसगडमध्ये जाजगीर, रायपूर, सक्ती येथून आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशी दरम्यान यात आणखी काही जण सहभागी असल्याचे समोर आले. त्यांनाही पोलिसांनी अटक केली असून एकूण अटक आरोपींची संख्या दहा झाली आहे.  रितेश अजंगले , मायकल साहू ,रवींद्र यादव , अमन हरपाल, शैलेंद्रसिंग चव्हाण आणि दिगंत अवस्थी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Advertisement

हेही वाचा - मशागत आवाक्याबाहेर, शेतमजुरी परवडेना; खतांचे दर गगनाला भिडल्याने बळीराजा चिंतेत!

आरोपींच्या खात्यातील रक्कम गोठवली

आरोपींनी वापरलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यामधील 70 लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. आरोपींकडून बँकेचे तीन स्टॅम्प, प्रोप्राइटरचे तीन स्टॅम्प, सरपंचाचे नावे असलेले स्टॅम्प, 17 डेबिट कार्ड, 74 धनादेश, 60 पासबुक व एक लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. ही कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शना खाली सायबरचे पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या पथकाने केली.

Advertisement