आता सर्वसामान्यांचा वावर असलेल्या दुकानांमध्येही नशेचं चॉकलेट मिळत असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हैद्राबाद येथील एका दुकानातून चॉकलेट जप्त केले आहेत. या चॉकलेटमध्ये गांजा असल्याचं दिसून आलं आहे. धक्कादायक म्हणजे हे चॉकलेट ऑकर्षक पॅकेजसह आयुर्वेदिक औषधाच्या नावानं विकलं जात आहे. पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधारावर कारवाई केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशात तयार केलेली गांजायुक्त चॉकलेटची जप्ती करण्यात आली आहे. आयुर्वेदिक औषधाच्या नावाने विकलं जाणारं हे चॉकलेट हैद्राबादला घेऊन जात होते. सायबरबाद पोलिसांनी रविवारी पेट्सबाशीराबादच्या किराणा दुकानात विकली जाणारी चॉकलेटची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पॅकेटवर छापलेल्या डिटेल्सनुसार, प्रत्येक 100 ग्रॅम चॉकलेटमध्ये 14 ग्रॅम गांजा आढळला आहे.
नक्की वाचा - भयंकर दुर्दैवी : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच 4 सख्ख्या भावंडांचा मृत्यू
सायबरबाद स्पेशल ऑपरेशन टीमच्या अधिकाऱ्यांनी कोमल किराणा स्टोअरवर धाड टाकली होती. या दरम्यान पोलिसांना कमीत कमी 200 पॅकेट्स मिळाले होते. दुकान चालवणारा पांडे हा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. या पॅकेटवर लिहिलं आहे की, अपचन आणि पोटासंबंधित आजारात दोन वेळा पाण्यासोबच घेऊ शकता. तपासात पांडे यांनी पोलिसांना सांगितलं की, उत्तर प्रदेशात आयुर्वेदिक औषध खूप सहजपणे उपलब्ध होते. याचा उपयोग डायबेटिससाठी केलं जातो.
गेल्या सहा महिन्यांपासून या दुकानात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली गांजायुक्त चॉकलेट विकलं जात आहे. तेलंगाना नार्कोटिक्स ब्युरोने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये गांजायुक्त चॉकलेट तयार करणाऱ्या अनेकांची ओळख पटवली आहे.