Breaking
News

आईनंतर पूजा खेडकरांच्या वडिलांवर टांगती तलवार; पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पूजा खेडकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी पोलिसांकडे देण्यात आली होती. पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आल्या होत्या, त्यावेळी त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.