थरकाप उडवणारा VIDEO! ऑफिसमध्ये घुसून Ex गर्लफ्रेंडवर चाकून केले 20-25 वार, स्वतःच्या गळ्यावरही फिरवला चाकू

Mohali Dimple Murder Video: ब्रेकअपनंतर प्रियकराने ऑफिसच्या डेस्कवर काम करणाऱ्या डिंपल नावाच्या तरुणीची क्रूरपणे हत्या केली. मोहाली डिंपल मर्डर केसचे थरारक तपशील आणि पोलिसांच्या तपासाची मोठी अपडेट जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Viral Video: एक्स गर्लफ्रेंडवर ऑफिसमध्ये घुसून चाकून सपासप वार"
ndtv
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पंजाबमधील मोहाली शहरात एका खासगी कंपनीतील डिंपल नावाच्या तरुणीवर ऑफिसमध्ये चाकूने सपासप हल्ला करण्यात आला होता
  • आरोपी हरविंदर उर्फ हॅरीने ब्रेकअप झाल्यानंतर डिंपलवर हिंसक हल्ला केला
  • डिंपलचा मृत्यू झाला, तर हॅरीची प्रकृती गंभीर आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मोहाली:

Mohali Dimple Murder Video: ऑफिसमध्ये आपल्या डेस्कवर बसून काम करणाऱ्या तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सुरुवातीला करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पीडित तरुणी जेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी पळाली तेव्हा तरुणाने गेटजवळ पकडून तिच्यावर अनेक वार केले. त्यावेळेस लोक वाचवायला आले तरीही आरोपी हल्ला करतच राहिला. प्रेमसंबंधांतील ब्रेकअपनंतर एका माथेफिरू प्रियकराने घडवून आणलेली ही थरकाप उडवणारी घटना पंजाबमधील मोहाली शहरात घडली आहे. जिथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या डिंपल नावाच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. डिंपलवर चाकूने हे सपासप वार तिच्यासोबतच काम करणाऱ्या हरविंदर उर्फ हॅरीने केले. डिंपलवर अनेक वार केल्यानंतर हॅरीने स्वतःचेही गळा चिरून जीव देण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. या हल्ल्याचा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडीओही समोर आला आहे.

दोघांनाही गंभीर अवस्थेत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे तरुणीचा मृत्यू झाला. डिंपल ही पटियाला शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे, तर आरोपी हरविंदर मान उर्फ हॅरीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Advertisement

VIDEO: मोहालीमध्ये ऑफिसमध्येच तरुणीवर चाकूने सपासप वार 

सुरुवातीच्या हल्ल्यांनंतर जेव्हा डिंपल स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती,तेव्हा आरोपी हॅरीने गेटजवळ तिला पकडून पुन्हा तिच्यावर अनेक वार केले.

आधी मैत्री, मग प्रेम आणि नंतर ब्रेकअप

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे एका खासगी कंपनीत काम करत होते. जवळपास तीन वर्षांपासून ते एकत्र काम करत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण काही काळापूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झालं होतं. तेव्हापासून हॅरी डिंपलवर मनात राग धरून बसला होता. याच दरम्यान त्याने डिंपलवर जीवघेणा हल्ला केला.

(नक्की वाचा : Pune News: 'तुम्ही आत्महत्या करा..' नसरापूरच्या पीडित मुलीच्या वडिलांना सोशल मीडियावरून दिला जातोय त्रास VIDEO)

मोहाली डिंपल मर्डर केस: तीन फोटोंमध्ये समजून घ्या संपूर्ण घटनाक्रम

चेअरवर बसलेल्या डिंपलवर हल्ला करण्यासाठी हॅरी आला, मग मागून मानेजवळ चाकू मारला; त्यानंतर पळण्याच्या प्रयत्नात असताना डिंपलवर वारंवार चाकूने वार केले. Photo Credit: ndtv

संबंध सुधारण्याचा प्रयत्न, पण अपयश

रिपोर्टनुसार ब्रेकअपनंतर आरोपी हॅरी पूर्णपणे खचला होता. तो मानसिकरित्या त्रासला होता. त्याने डिंपलसोबत पुन्हा संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. यामुळे तो खूप त्रस्त झाला होता.

ऑफिसमध्ये पोहोचून चाकूने केला हल्ला

गुरुवारी (4 जून) उशीरा संध्याकाळी आरोपी कंपनीत पोहोचला, जिथे आरोपी आणि मृत तरुणीमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला. याच दरम्यान त्याने चाकूने डिंपलवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हे पाहून इतर कर्मचारीही घाबरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही जखमींना तातडीने फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले, तर हरविंदरवर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

(नक्की वाचा : Nagpur News: बुरखा घालायला लावला, कलमा वाचायला सांगितला, बंद खोलीत तरुणीसोबत जे घडलं त्याने...

पालकांना दिली घटनेची माहिती: पोलीस
मोहालीच्या फेज-11 पोलीस ठाण्याचे एसएचओ (SHO) अमन बैदवान यांनी सांगितले की, मुलीचा मृत्यू झाला आहे. तिच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. ते आल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.

डिंपल आणि हॅरीचा फाइल फोटो.
Photo Credit: ndtv

संध्याकाळी 7.40 वाजता माहिती मिळाली, घटनास्थळ सील

एसएचओ यांनी सांगितले की, पोलिसांना या घटनेची माहिती साधारण संध्याकाळी 7.40  वाजता मिळाली होती, त्यानंतर लगेचच टीम घटनास्थळी पाठवण्यात आली. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आणि सर्व आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही जप्त करून तपास केला जात आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम रात्री सुमारे रात्री 10 वाजेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होती आणि तो परिसर सील करण्यात आला होता. पोलीस अद्याप हल्ल्यामागच्या नेमक्या कारणांची पुष्टी करू शकलेले नाहीत आणि आरोपी-मृत तरुणीच्या संबंधांचीही चौकशी केली जात आहे.

Advertisement