WhatsApp Alert : 'हा फोटो बघ', व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला तर रिप्लाय...; केंद्र सरकारकडून अलर्ट

तुम्हालाही असा मेसेज आलाय का? यापुढे आला तर काय कराल? जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

WhatsApp Hijack : तुम्हाला व्हॉट्सअॅपवरुन 'हा फोटो बघ' असा मेसेज आला तर हा मेसेज तुमच्या खासगी अधिकाराचा भंग करणारा ठरू शकतो. केंद्र सरकारने याबाबत इशारा दिला असून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

भारतीय सायबर सुरक्षा एजन्सी सीईआरटी-इनने व्हॉट्सअ‍ॅपच्या डिव्हाइस लिकिंग फीचरमधील एका मोठ्या तंत्रज्ञानातील त्रुटीचा शोध लावला आहे. यामध्ये गुन्हेगार पासवर्ड किंवा सिम स्वॅपिंगचा वापर न करता व्हॉट्सअॅपचा ताबा घेऊ शकतात, याला 'घोस्टपेयरिंग' असं म्हटलं जातं. अशा प्रकारे व्हॉट्सअॅप हॅक करून तुमचा वैयक्तित डेटा हॅक केला जाऊ शकतो. 

कसा होतो सायबर अटॅक?

सुरुवातीला युजरला एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर एक लिंक शेअर केली जाते. या खाली 'हाय, हा फोटो बघ' असा मेसेज केला जातो. लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतं. जिथं कंटेन्ट पाहण्यासाठी युजरला व्हेरिफाय करण्याची सूचना दिली जाते. अनावधानाने मोबाइलवर आलेला कोड युजर वापरतो आणि हॅकरच्या ब्राऊझरला आपल्या व्हॉट्सअॅपशी लिंक करतो. ज्यामुळे हॅकरला तुमच्या व्हॉट्सअॅपवरील सर्व चॅट, फोटो आणि व्हिडिओचा अॅक्सेस मिळतो. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Sangli News : विवस्त्र अवस्थेत 'ती' रस्त्यावर आली, 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात भयंकर घडलं, सांगली हादरली!

हे करू नका...

अशा प्रकारच्या कोणत्याही सायबर अटॅकपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी अधिक सजग राहणं आवश्यक आहे. कोणाकडूनही आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. व्यक्ती ओळखीची असली तरीही संशय वाटल्यास तिला कॉल करुन खात्री करू घ्या. व्हॉट्सअॅपच्या लिंक डिव्हाइसमध्ये जाऊन आपलं व्हॉट्सअॅप आणखी कोणत्या डिव्हाइसला लिंक आहे का, ते तपासून पाहा. लिंक असल्याचं दिसल्याच लगेच आऊट करा. आपल्या व्हॉट्सअॅपचा टू-स्टेप व्हेरिफिकेशन सतत सुरू राहूद्यात.  

Advertisement


 

Topics mentioned in this article